पत्रकारांच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना निमंत्रण

0
16

नांदेड,दि.11  – मराठी पत्रकार परिषदेचे नांदेड येथे दि. 17 व 18 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. या आधिवेशनाच्या समारोप सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण मराठी पत्रकार परिषदेच्या स्थानिक शाखा पदाधिकार्‍यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना दिले. नांदेड येथे होणार्‍या अधिवेशनाची जय्यत तयारी सुरु असून यानिमित्ताने पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांनी अशोकराव चव्हाण यांची भेट घेतली व अधिवेशनास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची विनंती केली. पत्रकार संघाचे निमंत्रण आपण स्विकारले असून समारोपाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे त्यांनी यावेळी मान्य केले. यावेळी राज्य व देशातील अनेक घडांमोंडीवर पत्रकारांशी त्यांनी चर्चा केली. यावेळी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष संजीव कुलकर्णी, विभागीय सचिव विजय जोशी, माजी सरचिटणीस चारुदत्त चौधरी, जिल्हाध्यक्ष प्रदिप नागापूरकर, माजी कार्याध्यक्ष संतोष पांडागळे, महानगराध्यक्ष विश्वनाथ देशमुख, कार्यध्यक्ष रविंद्र संगनवार, जिल्हासरचिटणीस सुभाष लोणे आदी पत्रकार पदाधिकार्‍यांचा या भेटीमध्ये समावेश होता.