मुख्य बातम्या:

लिटील फ्लॉवर स्कुल लाखनी येथे कार्यशाळा

लाखनी,दि.11ः- द लिटील फ्लॉवर स्कुल लाखनी येथे वर्ग व्यवस्थापन व प्रभावी अध्यापन या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला प्रसिद्ध प्रशिक्षक व शिक्षण विषयक गोष्टींच्या अभ्यासक प्रा. श्वेता ललवाणी या प्रसंगी मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. एका वर्गात विविध प्रकारचे विद्यार्थी असतात. त्यांची समजून घेण्याची पद्धत वेगवेगळी असते. ते अभ्यासून मुलांना शिकवले पाहिजे आणि शिकवताना तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे मात्र त्यासोबतच ज्या मूलभूत तंत्राच्या द्वारे विद्यार्थी चांगलं ज्ञान आत्मसात करून शिकू शकतात ती तंत्रे वापरणे देखील आवश्यक आहे. 21 व्या शतकात विद्यार्थी लहानपणापासून मोबाईल, टीव्ही, संगणक या सर्व गोष्टी बघतात त्यामुळे त्यांना कल्पकतेने ज्ञानार्जन करणे आवडते त्याचा वापर देखील अध्यापनात केल्याचे फायदे होतात. तसेच व्यवस्थित वर्गव्यवस्थापनाचे फायदे आणि महत्व देखील याप्रसंगी प्रा. श्वेता ललवाणी यांनी विशद केले आणि वर्गव्यवस्थापन व प्रभावी अध्यापन याविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेच्या प्राचार्या आशा वणवे उपस्थित होत्या. द लिटील फ्लॉवर स्कुल येथे लिटील फ्लॉवर्स नॉलेज पॉईंट अंतर्गत अशा विविध उपक्रमांचे आयोजन शाळेत करण्यात येत असते. यापूर्वी देखील विद्यार्थी व शिक्षकांसाठी विविध उपक्रम व कार्यक्रम शाळेने राबवले आहेत.

Share