मुख्य बातम्या:

सिरोच्यांत पोलीस शिपायाचा गोळी लागून मृत्यू

गडचिरोली(अशोक दुर्गम),दि.१३:- गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा पोलीस ठाणेपरिसरातील वसाहतीत राहणार्या पोलीस शिपाई संजीव रामय्या शेट्टीवार ब. न.५७५४ (३०) हा बंदुक साफ करीत असतांना बंदुकीतून गोळी सुटून डोक्यालाने आज मंगळवारला सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला.सिरोंचा येथील सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतरत्यांना वारंगल येथील एका खासगी रुग्णालयात भरती केले आसता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.सदर पोलीस जवान हा सिरोंचा तालुक्यातील नरसिंहपल्ली येथील रहिवासी तो क्युआरटी व सी ६० पथकात होता.त्याचा मागे पत्नी ,1 मुलगा व २ वर्षाची मुलगी आहे.पोलीस विभागाचे अधिकारी यासंदर्भात तपास करीत असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे.

Share