भाषण कलेतून नेतृत्वगुणांचा विकास : प्रा. उमेश मेंढे

0
15

गोंदिया,दि.13 : भारतीय संस्कृती ही आज जगभरात स्विकारल्या जात आहे. या संस्कृतीतील विविध अंगांपैकीच एक म्हणजे भाषण कला. याच भाषणाच्या माध्यमातून स्वातंत्र्यपूर्व काळात जनजागृतीचे मोठे कार्य झाले. आजघडीला ही भाषण कलाच विद्याथ्र्यांमधील नेतृत्वगुणासह विचारशक्ती वाढीस लावीत आहे, असे प्रतिपादन प्रा. उमेश मेंढे यांनी केले.
ते क्रांतीदिनाचे औचित्य साधून विदर्भ साहित्य संघातर्फे १० ऑगस्ट रोजी बापट लॉन येथे आयोजित स्वयंस्फुर्त भाषण स्पर्धेचे परीक्षक म्हणून बोलत होते. यावेळी प्रामुख्याने परिक्षक म्हणून पत्रकार जयंत शुक्ला, जयश्री विभुते यांच्यासह संस्थेचे सचिव प्रदिप व्यवहारे, सहसचिव दीपक वेरुळकर, चैतन्य मातुरकर, सांस्कृतिक सल्लागार अरqवद बरडे, सांस्कृतिक प्रमुख भैरवी देशपांडे, सांस्कृतिक संयोजक गौरव धोटे, सदस्य संजीव बापट, विनोद हिरडे, स्वाती qपपळापुरे, qकजल मेहता, राजन चौबे आदी उपस्थित होते. दोन गटात झालेल्या या स्पर्धेत शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. ही स्पर्धा देशातील विद्यमान घडामोडीवर आधारीत होती. तसेच विद्याथ्र्यांनी मराठी, qहदी व इंग्रजी भाषेतून विद्याथ्र्यांना आपले विचार मांडले. प्रत्येक स्पर्धकाला ३ मिनिटाचा वेळ देण्यात आला होता. पाचवी ते सातवी ‘अङ्क गटात प्रथम क्रमांक पोद्दार इंटरनॅशनल शाळेची कलीका पाटील, व्दितीय गुजराती नॅशनल हायस्कूलची समिक्षा शेंडे व तृतीय क्रमांक लिटील वुड शाळेचा आदित्य qसग याने पटकाविला. तसेच आठवी ते दहावी ‘बङ्क गटात प्रथम क्रमांक पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी पार्थ जानी, व्दितीय लिटील वुड शाळेचा प्रथमेश कुळकर्णी व तृतीय क्रमांक आदर्श qसधी शाळेची मुस्कान शामलानी हिने पटकविला. या विद्याथ्र्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व सहभागी विद्याथ्र्यांना प्रमाणपत्र व साहित्य लिखानासाठी डायरी देण्यात आली. याप्रसंगी जयंत शुक्ला, जयश्री विभुते यांनीही मनोगत व्यक्त करीत अशा स्पर्धांसाठी पालकांनी आपल्या पाल्यांना व शिक्षकांनी विद्याथ्र्यांना प्रोत्साहीत करण्याचे आवाहन केले. स्पर्धेच्या ‘अङ्क गटाचे संचालन सीमा बढे तर ‘बङ्क गटाचे राजन चौबे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन भैरवी देशपांडे यांनी केले तर आभार चैतन्य मातुरकर यांनी मानले. आयोजनासाठी राजश्री धामोरीकर, कुमार कोकणे, माणिक गेडाम आदींनी सहकार्य केले.