मुख्य बातम्या:

काँग्रेस सामान्य कार्यकर्त्यांच्या विश्वासावर चालणार पक्ष : वराडे

गोंदिया,दि.13 : काँग्रेस हा बंधुता, एकात्मता आणि समतेच्या विचारधारेवर चालणार पक्ष आहे. कार्यकर्त्यांच्या भरोशावर चालणाऱ्या या पक्षाच्या संघटनेचे जाळे आजही टिकून आहे. सध्या भाजपाचे नेते सत्तेच्या माध्यमाने प्रलोभन आणि दडपशाही करून अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश देत आहेत. भविष्यात आणखी काही स्वार्थी नेते आणि कार्यकर्ते पक्ष सोडून जाऊ शकतात. यामुळे सामान्य कार्यकर्त्यांच्या भरोशावर पक्ष संघटनेला मजबूत करण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव तथा गडचिरोली जिल्हा काँग्रेस प्रभारी अमर वराडे यांनी केले. ते गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या वतीने आयोजित सभेत बोलत होते. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे अध्यक्ष जितेंद्र कटरे,शिशुपाल पटले, मोहित इटनकर, राजू चामट,अशोक पटले,नामदेव नाईक,राजेश येरणे,हितेश मेश्राम,अनिल बिलिया,संदिप शेंडे,पवन गायधने,चेतन शेंडे,सुनिल तिडके,अनिकेत चौधरी उपस्थित होते..

Share