मुख्य बातम्या:

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी;कर्जवितरण, गुणवतांचा सत्कार व शिष्यवृत्ती वाटप

गोंदिया,दि.१३.: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ व सामाजिक न्याय विभाग यांच्या संयुक्तवतीने करण्यात आली. यानिमित्ताने आयोजित एका कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य देवसूदन धारगावे होते. प्रमुख पाहूणे म्हणून समाजकल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, प्रा. धर्मवीर चव्हाण यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात मातंग समाजातील व गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच बेरोजगार व्यक्तींना कर्जवितरण व विदयार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रा. चव्हाण श्री धारगावे, श्री वानखेडे यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सी.जी.उके यांनी केले. संचालन पप्पू वासनिक यांनी तर उपस्थितांचे आभार गजानन उमरे यांनी मानले. कार्यक्रमाला सामाजिक न्याय विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, सर्व महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी तसेच मातंग समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महामंडळाचे राजेंद्र निखाडे, वामन लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते विपेंद्र वासनिक, हेमंत साखरे यांनी परिश्रम घेतले.

Share