पी.डी.रहागंडाले विद्यालयात गुणवंत विद्यार्थांचा सत्कार

0
20

गोरेगाव,दि.16ः- येथील पी.डी.राहांगडाले विद्यालय गोरेगाव येथे ७३ व्या स्वातंञदिनी महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.गुणवंत विद्यार्थ्यांना स्व.ग्यानीरामभाऊ देशमुख चॅरिटेबल ट्रस्ट गोरेगाव ,निर्मल कांप्युटर गोरेगाव,आयसेक्ट कांप्युटर, गोरेगाव,स्व.अनंदाबाई फगलाल बघेले स्मृतिपुरस्कार,पुर्णाबाई नंदेश्वर पुरस्कार,स्व.गोपीबाई राठोड स्मृतिपुरस्कारा ने सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ ‌टी.पी.येळे हे होते.प्रमुख पाहुणे पी.एफ.बघेले माजी प्राचार्य,एच.डी.कावळे प्राचार्य,वाय.आर.चौधरी पर्यवेक्षक,व इतर पाहुणे उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन प्रा.सी.आर.बिसेन व सौ.एम.डी.राहांगडाले यांनी केले तर आभार प्रदर्शन ए.एच.कटरे सरांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर.वाय.कटरे,डी.एम.राठोड जी.ड्ब्लु‌.राहांगडाले व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.