कोल्हापूर-सांगलीसाठी 10 लाख रुपयांची मदत सामुग्री रवाना;पालकमंत्र्यांनी दाखविली हिरवी झेंडी

0
16

नागपूर, दि.16: कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी  नागपुरातून 10 लाख रुपयापर्यंतची मदत सामुग्री आज ट्रकने रवाना करण्यात आली.  विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून ट्रक रवाना करण्यात आला. यावेळी डी. पी. जैन एज्युकेशन ट्रस्टचे पल्लव जैन, गिरीश जैन, अरिहंत जैन, धर्मेंद्र शर्मा, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलिस आयुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय,जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, महापालिका आयुक्त अभिजित बांगर, नागपूर परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक श्री. प्रसन्ना, सह पोलिस आयुक्त श्री. कदम यासह पोलिस उपायुक्त, उपायुक्त (सामान्य प्रशासन) संजय धिवरे विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.डी. पी. जैन एज्युकेशन ट्रस्ट या संस्थेतर्फे ही मदत सामुग्री पाठविण्यात आली असून, त्यात जीवनावश्यक तांदूळ, साखर, दाळ, मसाले आदि वस्तू तसेच बॅटरी, औषध, चादरी,चटई, पाण्याच्या बाटल्या, अशा विविध वस्तूंचा समावेश आहे.