महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम व नियम सुधारणा समितीची 19 ला नागपूरात तर २० ऑगस्ट रोजी अमरावतीत बैठक

0
27

गोंदिया/वाशिम, दि. १६ : महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, १९६७ व त्याच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेले चार नियमांमध्ये कालानुरुप सुधारणा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या नियमामध्ये महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये (सहायक अनुदान आणि इमारत व साधनसामग्री अनुदाने यासाठी मान्यता) नियम,१९७०, महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय संघ (सहायक अनुदानासाठी मान्यता देणे) नियम, १९७१, महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये, राज्य ग्रंथालय परिषद व जिल्हा ग्रंथालय समित्या (कामकाजाची कार्यपध्दती) नियम, १९७३, महाराष्ट्र ग्रंथालयांना (संशोधन व साहित्यिक परिसंस्थांची ग्रंथालये)सहायक अनुदानाकरिता मान्यता देण्याचे नियम,१९७४ याचा समावेश आहे. याकरिता ग्रंथालय संचालक सु. हि. राठोड यांच्या अध्यक्षतेखाली सुधारणा समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समितीची विभागवार बैठक, नागपूर येथे सोमवार दि.19 ऑगस्ट 2019 रोजी सारस्वत सभा वाचनालयाच्या गीता रॉय मेमोरीयल हॉल, छोटी धंतोली , नागपूर येथे सकाळी 11.00 वाजता आयोजित केलेली आहे.या समितीची विभागवार बैठक मंगळवार, २० ऑगस्ट २०१९ रोजी अमरावती येथील शासकीय विभागीय ग्रंथालय, मोर्शी रोड, अमरावती येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे.

            सदर बैठकीसाठी नागपूर व अमरावती विभागातील शासनमान्य जिल्हा व तालुका ग्रंथालयाचे अध्यक्ष/ कार्यवाह, ग्रंथपाल, सर्व जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष/ कार्यवाह, ग्रंथालय चळवळीशी संबंधित स्थानिक लेखक, साहित्यिक, वृत्तपत्र संपादक/प्रतिनिधी, मुद्रक, प्रकाशक, ग्रंथविक्रेते, वाचक व सभासद, विद्यापीठ/महाविद्यालयीन/ शालेय ग्रंथपाल/ प्राध्यापक, ग्रंथालय संचालनालयातील माजी अधिकारी इत्यादींनी उपस्थित राहण्याचे आवाहन सहाय्यक ग्रंथालय संचालक श्रीमती मिनाश्री रा. कांबळे नागपूर विभाग, नागपूर ,अमरावती विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक जगदीश पाटील यांनी केले आहे