जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

0
45

गोंदिया दि.१६ : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी राष्ट्रध्वजारोहण केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांनी उपस्थितांना तंबाखुमुक्तीची आणि मुलांच्या हक्कांच्या संरक्षणाची शपथ दिली.
राष्ट्रध्वजारोण कार्यक्रमाला भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधिन अधिकारी रोहण घुगे, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी हरीष धार्मिक, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, राहूल खांदेभराड, जिल्हा कोषागार अधिकारी विजय जवंजाळ, जिल्हा नियोजन अधिकारी मृणालीनी भूत, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रवीण तांबे, जिल्हा खनिकर्म अधिकारी राजकीरण गजभिये, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी संदीप भिमटे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी पंकज गजभिये, नगरपालिका प्रशासन अधिकारी श्री जाधव, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक श्री माटे, लेखाधिकारी श्री बावीस्कर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांचेसह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

नवीन प्रशासकीय इमारतीत ध्वजारोहण
गोंदिया दि.१६ : जयस्तंभ चौकातील नवीन प्रशासकीय इमारतीत राष्ट्रध्वजारोहण उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांनी केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना तंबाखुमुक्तीची आणि मुलांच्या हक्कांच्या संरक्षणाची शपथ दिली.यावेळी सहायक धर्मादाय आयुक्त विशाल शेंडे, जिल्हा उपनिबंधक श्री एस.सी. कांबळे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री ढोणे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, जिल्हा क्षयरोग अधिकारी राज पराडकर, सहायक निबंधक अनिल गोस्वामी, तहसिलदार राजेश भांडारकर, अपर तहसिलदार अनिल खडतकर, जिल्हा विशेष लेखा परिक्षक मिलिंद आटे, जिल्हा सांख्यिकी अधिकारी एन. एच. चव्हाण, उपअधीक्षक भूमी अभिलेख सतीश पवार, राज्य गुप्त वार्ता विभागाचे सहायक आयुक्त बी.के. वडतकर, स्थानिक लेखा परिक्षक व्ही. एम. राऊडकर यांच्यासह प्रशासकीय इमारतीत असलेल्या अन्य विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.