संख येथे अप्पर तहसिल कार्यालयासह विविध ठिकाणी ध्वजारोहण

0
19

संख(ता.जत),दि.17ः-येथील विविध शासकीय कार्यालये,शाळा महाविद्यालयासंह सहकारी संस्थामध्ये ध्वजारोहण करुन स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.संख येथील अप्पर तहसिल कार्यालयात अप्पर तहसिदार प्रशांत पिसाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी विरमाता अनिता रावसाहेब पाटील ,मंगल धोडांप्पा काशीद , या दोन्ही शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.यावेळी तहसिल कार्यालयाचे एल.एल.भडके अवल कारकुण , बागल लिपीक ,बागूल लिपीक ,सोनुले लिपीक ,उपस्थित माजी सैनिक सुभेदार बापु माने ,पाटबंधारे शाखाधिकारी अशविनी गायकवाड आधी मान्यवर उपस्थित होते.

संख येथील आर.के.पाटील महाविद्यालये मध्ये स्वतंत्र दिन साजरा

संख -येथील आर.के.पाटील व श्री गुरूबसव विद्यामंदिर व ज्यु. कॉलेज संख येथे स्वतंत्र दिना निमित्त संखचे अप्पासाहेब पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व सांस्कृतिक विविध कार्यक्रम घेण्यात आले.तसेच या कार्यक्रमसाठी संस्थेचे संस्थापक तथा माजी सभापती आर.के.पाटील व मुख्याध्यापिका ,शिक्षक , शिक्षकेतर ,विद्यार्थी व विद्यार्थीनी व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

आर.बी.पी.हायस्कूल व ज्यु.कॉलेज संख येथे स्वातंत्र्य दिन 

येथील राजाराम बापू पाटील हायस्कूल व ज्यु.कॉलेज संख येथे स्वातंत्र्य दिना निमित्त माजी सरपंच सिदनिंगप्पा स्वामी व अपाराया पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी कार्यक्रमसाठी प्रमुख संस्थेचे संस्थापक तथा माजी जिल्हा परीषद उपाध्यक्ष बसवराज पाटील व संस्थेचे व्हाॕइस चेरअमन सुभाष बसवराज पाटील तसेच गावातील प्रतिष्ठित मान्यवर व मुख्याध्यापक , शिक्षक ,शिक्षकेतर ,विद्यार्थी , विद्यार्थीनी, व ग्रामस्थ उपस्थित होते.तसेच शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.