सेंद्रिय बाजारपेठ निर्मितीसाठी डॉ.कटरेंचे कृषिमंत्र्यांना निवेदन

0
10

गाेदिंया,दि.24 : ग्रामीण भागात आजही रोजगाराच्या संधी नाहीत. परिणामी ग्रामीण युवकांना रोजगारासाठी शहराकडे धाव घ्यावी लागते. यावर उपाय म्हणून येथील आरोग्य भारतीचे विदर्भ प्रांत उपाध्यक्ष डॉ. प्रशांत कटरे यानी  बहुआयामी दुग्ध उत्पादन व सेद्रींय बाजारपेठ निर्मिती प्रकल्प तयार केला असून त्यांच्या अंमलबजावणीसाठी राज्याचे कृषी मंत्री अनिल बोेंडे यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. निवेदनात हा प्रकल्प शेतकरी तसेच गटसमुहाच्या माध्यमातून २० ते २५ एकर शेतजमिन मालकांच्या माध्यमातून क्रियान्वित करून प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर प्रायोगिक तत्वावर सुरु करणे, जिल्ह्यात सेंद्रीय बाजारपेठ निर्मिती करून दुध, मासे, अंडी, कोंबड्या,कडधान्य आदी विषमुक्त बाजारपेठ उपलब्ध करून देणे, प्रकल्पासाठी स्वत:ची वीज निर्मिती करणे, प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्हास्तरावर बायोगॅस एकत्रित करून सीएनजी गॅस निर्मिती प्रकल्प तयार करणे, शेतकर्यांसाठी सेंद्रीय खत,निर्मिती करणे,जिल्ह्यातील ३५ एकर जमिनीवर शासनाने दुग्ध उत्पादन व सेंद्रिय बाजारपेठ प्रकल्प निर्माण करून ग्रामीण बेराेजगारीवर मात करण्यासाठी सहकार्य करावे आदी आशयाचे निवेदन डॉ. कटरे यांनी राज्याचे कृषी मंत्री अनिल बोंडे यांना दिले.कृषीमंत्री बोंडे यांनीही लगेच या विषयावर कृषी सचिवांना अहवाल तयार करुन सादर करण्याचे निर्देश दिले.