‘पुरावे असल्यास पंकज, समीर भुजबळ यांच्यावर गुन्हा नोंदवा’

0
19

मुंबई – दिल्ली येथील महाराष्ट्र सदनाच्या १०० कोटींच्या भ्रष्टाचारप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते व माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज व पुतण्या समीर यांच्याविरोधात पुरावे असल्यास गुन्हा नोंदवा, असे आदेश उच्च न्यायालयाने लाचलुचपतविरोधी विभागाला बुधवारी दिले. मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांच्या खंडपीठापुढे याप्रकरणी सुनावणी झाली. याप्रकरणी पूर्वाश्रमीच्या आम आदमी पार्टीच्या नेत्या अंजली दमानिया यांनी याचिका दाखल केली आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या बांधकामाचे कंत्राट भुजबळांच्या जवळचे कंत्राटदार चामनकर एंटरप्रायजेस यांना देण्यात आले आहे. याशिवाय समीर व पंकज संचालक असलेल्या परवेश कन्स्ट्रक्शन कंपनीनेही भ्रष्टाचार केल्याचा आरोप दमानिया यांनी याचिकेत केला आहे