सामाजिक न्यायमंत्र्याला लोकराज्य ने बनविले प्राध्यापक

0
30

दिलखुलास कार्यक्रमातील ना.बडोलेंच्या मुलाखतीच्या सारांशात केला उल्लेख

खेमेंद्र कटरे
गोंदिया-शासनाचे अधिकृत मासिक म्हणून लोकराज्यची ओळख खेळ्यापाळ्यात पोचली आहे.लोकराज्य मधील प्रकाशित माहिती म्हणजे शंभर टक्के खरी ही शासकीय व निमशासकीय सेवेतील सर्वांचाच विश्वास असतो.परंतु याच मासिकात जर एखाद्या महत्वाच्ङ्मा व्ङ्मक्तीच्ङ्मा नावे न केलेल्या कामाचा उल्लेख केला गेला तर काय म्हणावे,अशीच स्थिती निर्माण झाली आहे.लोकराज्य मासिकाच्या एप्रिलच्या अंकात राज्याचे सामाजिक न्याय मंत्र्याना चक्क प्राधापकाची पदवीच बहाल करण्यात आली आहे.जेव्हा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी प्राध्यापकी केल्याच्या कुठेच उल्लेख नाही.
माहिती व जनसंपर्क मंहासंचालनालयाच्यावतीने लोकराज्य चा एप्रिल २०१५ चा महामानव ,आपला आदर्श-आपली प्रेरणा हा अंक प्रकाशीत झालेला आहे.हा अंक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वनावर धारीत विविध लेखमालांनी सजलेला आहे.याच अंकातील पान क्रं.५६ वर प्रकाशित समन्यायी विकास या मथळ्याथाली लेखामध्ङ्मे मीरा ढास यांनी त्यांना चक्क प्राध्यापक राहिल्याचे म्हटले आहे.एवढेच नव्हे तर त्त्यांच्या कार्यशैलीत प्राध्यापकाचे गुण असल्याचे कौतुकही करण्ङ्मात आले आहे.जेव्हा की त्यांनी पॉलीटे्क्नीक केल्ङ्मानंतर बुलडाणा जिल्हा परिषदेत आधी अभियंता म्हणून नोकरीला सुरवात केली.त्यानंतर भंडारा जिल्हा परिषदेच्ङ्मा लघु पाटबंधारे विभागात अभिंयता म्हणून नोकरिला सुरवात केली.परंतु कुठेही प्राध्यापक म्हणून काम केल्याचे दिसून येत नसतानाही लोकराज्य च्या मासिकात त्यांनी प्राध्यपकाची नोकरी केल्याच्या उल्लेखांने शासकीय वुतर्ळात चचेर्चा विषय ठरला आहे.