35 न्यायाधीशांच्या बदल्या

0
13

नागपूर दि. ५ – नागपूर जिल्ह्यातील सत्र न्यायालय आणि प्रथमश्रेणी न्यायालयातील सुमारे 35 न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव किशोर जयस्वाल आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या उपप्रबंधक भारती किशोर जयस्वाल यांची मुंबईत न्यायालयात बदली करण्यात आली आहे.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. डब्ल्यू. चांदवाणी यांची पुणे, सहायक सत्र न्यायाधीश एस. जे. शर्मा यांची यवतमाळ, कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. बी. पाटक, न्यायाधीश एच. के. गणात्रा आणि न्यायाधीश एम. एम. अद्वैत यांची मुंबई, मोटार अपघात दावा प्राधिकरणाचे सदस्य एन. एम. साखरकर यांची बुलडाणा, अतिरिक्त न्यायाधीश ए. ए. नांदगावकर यांची मुंबई, अतिरिक्त मुख्य न्यायाधीश के. आर. पाटील यांची उस्मानाबाद, कामगार न्यायाधीश एस. बी. देसाई यांची उस्मानाबाद, उपधर्मदाय आयुक्त अशोक कुळकर्णी यांची चंद्रपूर, प्रथमश्रेणी न्यायालयाचे न्यायाधीश एच. बी. शेळके यांची ठाणे, उमरेडचे न्यायाधीश व्ही. एल. भोसले यांची ठाणे, सावनेरचे न्यायाधीश एन. यू. पारमा यांची यवतमाळ, नागपूरच्या प्रथमश्रेणी न्यायाधीश श्रीमती एम. एस. सहस्रबुद्धे यांची अमरावती, रेल्वे न्यायाधीश एस. एस. सहस्रबुद्धे यांची अमरावती, मौदाचे न्यायाधीश एस. डी. घनवट यांची पुणे, नागपूर प्रथमश्रेणी न्यायाधीश जी. व्ही. जगनाडे-देशपांडे यांची अमरावती, काटोलचे न्यायाधीश जी. के. नंदनवार यांची पुणे, नागपूरचे न्यायाधीश आर. बी. लोहिया यांची वाशीम, नरखेडचे न्यायाधीश पी. टी. गोटे यांची पुणे, भिवापूरचे न्यायाधीश के. एम. जैसिंगानी यांची अकोला, कुहीचे न्यायाधीश एम. एम. वर्मा यांची नांदेड, नागपूर प्रथमश्रेणी न्यायाधीश श्रीमती आर. आर. लोहिया यांची वाशीम, रामटेकचे न्यायाधीश एस. जी. चिमणकर यांची यवतमाळ, नागपूरचे प्रथमश्रेणी न्यायाधीश जे. डी. हुसनगबाडे यांची अमरावती, काटोलचे न्यायाधीश एस. एच. शेख तज्जूम यांची यवतमाळ, हिंगण्याचे न्यायाधीश बी. एम. काळे यांची अकोला, कळमेश्‍वरचे न्यायाधीश एस. पी. बेदारकर यांची धुळे, नागपूर प्रथमश्रेणी न्यायाधीश ए. व्ही. ढोरे यांची यवतमाळ, नागपूरच्या प्रथमश्रेणी न्यायाधीश श्रीमती आर. आर. चौधरी यांची बुलडाणा, नागपूरचे प्रथमश्रेणी न्यायाधीश जी. डी. अग्रवाल यांची गडचिरोली येथे बदली करण्यात आली आहे.