यवतमाळमध्ये भीषण अपघातात सात ठार

0
14

यवतमाळ, दि. ३१ – यवतमाळ जिल्ह्यातील घाटी या गावात व-हाडी मंडळींना घेऊन जाणा-या बोलेरो गाडीला अपघात झाल्याने गाडीतील सात प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली आहे. मृतांमध्ये चार महिला, दोन लहान मुलं व एका पुरुषाचा समावेश आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा या गावातील लग्नाची वरात घाटी या गावात आली होती. व-हाडी मंडळींना घेऊन येणा-या बोलेरो गाडीच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व भरधाव वेगात असलेली गाडी पुलाच्या कठड्यावर जाऊन आदळली. ही धडक ऐवढी भीषण होती की सात प्रवाशांचा मृत्यू झाला तर ८ प्रवासी जखमी झाले. या प्रवाशांना यवतमाळमधील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.