उद्यापासून सेवाकरात वाढ, महागाई वाढणार

0
12

नवी दिल्ली दि. ३१ –– केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थंसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे सोमवारपासून सेवाकरात दीड टक्क्यांची वाढ होऊन तो १४ टक्के होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसणार आहे.
जेटली यांनी अर्थंसंकल्पात सेवाकरात १२.३६ टक्क्यांवरुन १४ टक्क्यांपर्यंत वाढीची घोषणा केली होती. एक जूनपासून याची अंमलबजावणी होत आहे. सेवा करात वाढ केल्याने सामान्य नागरिकांचे बुरे दिन सुरु होणार आहे.
रेल्वे प्रवास, विमान प्रवास, बँकिंग, विमा, जाहिरात, आर्किटेक्चर, बांधकांम, क्रेडिट कार्ड, टूर ऑपरेटर्स महागणार आहेत. तसेच हॉटेलिंग, सिनेमाचे तिकीट,वीज बिलातही वाढ होणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार फर्स्ट क्लास आणि एसी क्लासचा प्रवास महाग होणार. सध्या एसी क्लास आणि फर्स्ट क्लाससाठी तिकीटदरावर ३.७ टक्के सेवाकर आकारला जातो. एक जून पासून ४.२ टक्के इतका सेवा कर आकारला जाणार आहे.