नवीन १०० रूपयांची नोट येणार

0
11

मुंबई दि.२७– बनावट नोटांना आळा घालण्यासाठी आणि बनावट नोटांच्या व्यवहारांवर नियंत्रण आणण्यासाठी रिझर्व्ह बँक १०० रू.ची नवी नोट जारी करत असल्याचे गुरूवारी जाहीर करण्यात आले आहे. मं.गांधी सिरीज २००५ च्या १०० रूपयांच्या नोटा नवीन नंबर पॅटर्नसह चलनात आणल्या जात असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे.

नवीन नोटांमध्ये दोन्ही पॅनेलमधील नंबरचे आकडे डावीकडून उजवीकडे मोठ्या आकाराचे होत जातील. पहिले तीन आकडे पूर्वीच्याच आकारात असतील. यामुळे नोटांची सुरक्षा वाढणार आहेच पण सर्वसामान्य नागरिकही खरी आणि बनावट नोटेतील फरक सहज ओळखू शकतील असे सांगितले जात आहे. या नोटेत दोन्ही नंबर पॅनलमध्ये आर हे अक्षरही आहे.

या नोटांवर छपाई साल २०१५ व गव्हर्नर रघुराम राजन यांनी सही असणार आहे. अर्थात जुन्या १०० रूच्या नोटा चलनात राहणार आहेत. मात्र हळूहळू सर्वच चलनी नोटांसाठी हे नवे सिक्युरिटी फिचर जोडले जाणार आहे असे समजते.