33.1 C
Gondiā
Tuesday, March 19, 2024
Home Blog

रेपनपल्लीच्या जंगलात चार नक्षलवाद्यांच्या चकमकीत खात्मा

0

गडचिरोली दि.१९::अहेरी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या रेपनपल्लीच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये काल रात्री भीषण चकमक झाली. या चकमकीत चार नक्षल्यांचा खात्मा झाल्याची माहिती पुढे येत आहे.पोलिसांनी घटनास्थळी सर्चिंग ॲापरेशन सुरू केले असल्याचे सांगितले जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांसाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे.अहेरी उपपोलीस मुख्यालयातून सी-60 आणि सीआरपीएफ क्यूएटीची अनेक पथक यासच अतिरिक्त एसपी ऑपरेशन यतीश देशमुख यांच्या नेतृत्वात परिसरात शोधमोहीम सुरु आहे.

पुढेआलेल्या माहितीनुसार, परिसरात असलेल्या कोलामार्का येथे आज पहाटे सर्च ऑपरेशन सुरु असताना सी-60 दलांच्या एका पथकावर नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. याला पथकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. गोळीबार थांबल्यानंतरपरिसराची झडती घेतली असता 4 पुरुष नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. naxalites killed in Repanpalli गोळीबाराच्या ठिकाणाहून एक एके 47, एक कार्बाइन आणि 2 देशी बनावटीचे पिस्तूल, नक्षलवादी साहित्य आणि सामान जप्त करण्यात आले आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये डीव्हीसीएम वर्गेश, डीव्हीसीएम मागटू, पलटन सदस्य कुरसंग राजू आणि ⁠पलटन सदस्य कुडिमेट्टा व्यंकटेश यांचा समावेश आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांसाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे.

लोकायुक्तांकडून राज्यपाल रमेश बैस यांना वार्षिक अहवाल सादर

0

मुंबई, दि. 19 : राज्याचे लोक आयुक्त न्या. वि. मु. कानडे (नि.) व उप लोक आयुक्त संजय भाटिया यांनी सोमवारी (दि. १८) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेऊन आपल्या कामकाजासंबंधीचा ५० वा वार्षिक एकत्रित अहवाल राज्यपालांना सादर केला.

महाराष्ट्र लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त अधिनियम, १९७१ च्या कलम १२ पोटकलम (६) नुसार, सन २०२२ मधील कामकाजासंबंधी हा अहवाल सादर करण्यात आला.

लोकायुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार २०२२ या अहवालाधीन वर्षात लोकायुक्त कार्यालयाकडे ५५३० नवीन तक्रारी नोंदविण्यात आल्या. वर्षाच्या सुरुवातीला ३४१५ प्रकरणे प्रलंबित होती. अशा प्रकारे सन २०२२ मध्ये ८९४५ प्रकरणे कार्यवाहीकरीता उपलब्ध झाली.

नोंदणी केलेली ४३६२ प्रकरणे अहवालाधीन वर्षात निकाली काढण्यात आली आणि सन २०२२ च्या वर्षअखेरीस ४५८३ प्रकरणे प्रलंबित राहिली, असे लोकायुक्त कार्यालयाकडून यावेळी कळविण्यात आले.

महाराष्ट्रातील लोक आयुक्त संस्थेने गेल्या पाच दशकांमध्ये अनेक तक्रारदारांची गाऱ्हाणी दूर केली असून गेल्या काही वर्षात ७५% पेक्षा जास्त तक्रारींमधील तक्रारदारांच्या गा- हाण्यांचे निवारण करण्यात आले असल्याचे नमूद करण्यात आले.

००००

State Lokayukt presents report to Governor

Mumbai, 18th March : State Lokayukta Justice V. M. Kanade (retd) and Upa Lokayukta Sanjay Bhatia submitted the 50th Annual Consolidated Report about the performance of Lokayukta and Upa-Lokayukta for the year, 2022 to State Governor Ramesh Bais at Raj Bhavan Mumbai on Mon (18 Mar).

According to the information provided by the office of Lokayukta, 5530 fresh complaints were registered by the office in the year 2022. There were 3415 cases already pending from the previous year for investigation. Out of the total 8945 cases available for disposal during the year 2022, a total of 4362 registered cases were disposed of during the year leaving behind a balance of 4583 cases at the end of the year 2022.

It was stated that the institution had succeeded in redressing the grievances of many complainants during the last 5 decades. According to the statement given by the office of Lokayukta, grievances in more than 75% complaints were redressed to the satisfaction of the complainants.

ग्राहकांची मागणी व गरज ओळखून दर्जेदार गुणवत्ता पूर्ण उत्पादनांची निर्मिती व्हावी : मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला

0

सातारा  : राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या महाबळेश्वर येथील मध संचालनालयात 15 मार्च जागतिक ग्राहक अधिकार दिवस कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय , विपणन व निरीक्षण निदेशनालय मुंबई यांच्या तर्फे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला (भा.प्र.से)  यांनी   शेतकरी उत्पादक कंपनी ,ब्रँड धारक, ॲग्री स्टार्टअप उत्पादकांना आवाहन केले की ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण उत्पादनांचा पुरवठा करणे ही मुख्यत्वे आपली जबाबदारी आहे व  ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी एगमार्क कार्यप्रणाली सेंद्रिय प्रमाणिकरण कार्यक्रमाली अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन केले.

राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या विविध योजना मध केंद्र सरकारने,प्रशिक्षण ,तसेच मधुबन ब्रँड हा एगमार्क व सेंद्रिय प्रामाणिक असल्याची यावेळी त्यांनी माहिती दिली. महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी महाबळेश्वर येठील  मध  उत्पादकासाठी हे प्रदर्शन व चर्चासत्र उपयुक्त असल्याचे सांगितले .भावेश कुमार जोशी ,उप कृषी विपणन सल्लागार , भारत सरकार,मुंबई यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. राघवेंद्र मुरगोड  सिनियर विपणन अधिकारी यांनी एगमार्क  लायसन्स प्रक्रिया सुलभ पद्धतीने सांगितली. मधा संचालनालयाचे संचालक विजय पाटील यांनी मध संचालनाला याचे उपक्रम याची माहिती दिली. कृषी विज्ञान केंद्र , बारामती, भूषण डेरे , वाई, 10000 शेतकरी उत्पादक कंपनी अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र व ॲग्री स्टार्टअप संस्थाचे प्रतिनिधी, तूप, गुळ, हळद, मध , लोणची इत्यादी आगमार्क प्रामाणिक खाद्यपदार्थ उत्पादक आणि स्टॉल लावलेले होते या स्टॉलला महाबळेश्वर मधील पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळाला मध तूप इत्यादी अन्नपदार्थातील भेसळ कशी ओळखावी याबाबतचे प्रात्यक्षिक ही मुंबई येथील आगमार्क कार्यशाळेने उपस्थितताना यावेळी दाखवले  मधमाशांच्या वसाहती मधमाशा हाताळण्याचे प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात आले मधमाशांचे विष संकलन कीट एका वेळी 100 राणी माशा तयार करायची किट या प्रदर्शनात मुख्य आकर्षण ठरले. आर पी नारायणकर यांनी सूत्रसंचालन केले संजय मेहरा यांनी उपस्थितांचे आभार मानले या कार्यक्रमास महाबळेश्वर तालुक्यातील महिला नागरिक मधपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी अस्वलाची भटकंती

0

अर्जुनी मोरगाव,दि.19-उष्ण कडक उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे.मानवाप्रमाणेच वन्यप्राण्यांनाही उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली असून अर्जुनी मोरगांव तालुक्यातील बोरटोला शिवारातील बोरटोला – इंजोरी मार्गाजवळील  खांबी येथील मळेघाट देवस्थान पहाडीवर रोजगार हमीचे काम सुरू असतांना कामावरील मजूरांना सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास अस्वल दिसल्याने त्यांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले.त्या ठिकाणी असलेल्या नाल्यावर आपली तृष्णा भागविण्यास आलेली अस्वल थोडी मानवी आरडाओरड झाल्यावर तिथून निघून गेली.मात्र तिथे उपस्थित असलेल्यांनी  मोबाईलच्या कॅमेरात दृष्टीस पडलेल्या अस्वलीला टिपले.

पशुधन विकास अधिकारी बावनकर लाच घेतांना जाळ्यात

0

गोंदिया,दि.19-सालेकसा पंचायत समिती येथील पशुधन विकास अधिकारी(विस्तार) सरोजकुमार ग्यानीराम बावनकर(56) व कंत्राटी चालक भुमेश्वर जवाहरलाल चौहाण(33) यांना 4 हजाराची लाच घेतांना लाचलूचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ(दि.18) पकडले.सविस्तर असे की,18 मार्च रोजी तक्रारदाराकडून आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने मराठवाडा पॅकेज अंतर्गत शेळीगट अनुदान वाटपमध्ये निवड झाली असून शेळ्यांचा अनुदानाचा पहिला हप्ता 57350 रुपयेचा धनादेश काढण्याकरीता पशुधनविकास अधिकारी यांनी 5 हजाराची मागणी केली.तक्रारदारास लाच द्यायची इच्छा नसल्याने लाप्रविभागाकडे तक्रार नोंदवली.तक्रारीवरुन कारवाई करतांना पशुधन विकास अधिकारी बावनकर यांनी तडजोडीअंती 4 हजार रुपये कंत्राटी वाहनचालक चौहाण यांच्याकडे देण्यास सांगितले.दरम्यान आरोपी क्रमांक 2 वाहन चालक यास लाच घेतांना रंगेहाथ पंचासमक्ष पकडण्यात आले.आरोपीविरुधद् सालेकसा पोलीस ठाणे येथे गु्न्हा दाखल करण्यात आले असून ही कारवाई पोलीस उपअधिक्षक विलास काळे,पोलीस निरिक्षक उमांकात उगले,अतुल तवाडे,सहाय्यक फौजदार संजयकुमार बोहरे,मंगेश कहालकर,संतोश शेंडे,संतोष बोपचे,अशोक कापसे,प्रशांत सोनवणे,संगिता पटले,चालक दिपक बाटबर्वे यांच्या पथकाने केली.

प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर प्रचाराचे कापडी फलक, झेंडे लावणेबाबत निर्बंध जारी – जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे

0

सिंधुदुर्गनगरी दि.18 – लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 साठी कार्यक्रम दि. 16 मार्च 2024 रोजी घोषित केला आहे. या अनुषंगाने निवडणूकीचे प्रचार मोहीमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि कार्यकर्ते आणि हितचिंतक हे निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर पक्ष प्रचाराचे फलक लावणे, झेंडे लावणे, आदीसाठी जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांनी निर्बंध आदेश जारी केला आहे.
यामध्ये फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजुला विंड स्क्रीन ग्लासच्या पुढे राहणार नाही आणि तो त्या वाहनाच्या टप्पा पासून 2 फुट उंची पेक्षा जास्त राहणार नाही. प्रचाराच्य फिरत्या वाहनांवर कापडी फलक वाहनचालकाच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजुने लावण्यात यावा, इतर कोणत्याही बाजुस तो लावता येणार नाही. फिरत्या वाहनांवार लावावयाचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधित पक्षाचे जिल्हा अध्यक्ष, उमेदवार व उमेदवाराचे निवणूक प्रतिनिधी यांनी निवडणूक प्रचारासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहनांव्यातिरिक्त इतर कोणत्याही वाहनांवर लावता येणार नाही. सदचा आदेश निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत दि. 6 जून 2024 पर्यंत अमलात राहतील.

जिल्हा परिषद शाळा मोरगाव येथे तालुकास्तरीय निपुणोत्सव उपक्रम थाटात

0

अर्जुनी मोर.-जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मोरगाव येथे तालुकास्तरीय निपुणोत्सव उपक्रमाचे आयोजनपंचायत समिती अर्जुनी-मोर चे गटशिक्षणाधिकारी ऋषीदेव मांढरे यांचे अध्यक्षतेखाली व पंचायत समिती अर्जुनी मोरगाव चे वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी अनिल चव्हाण, बेनिराम भानारकर, गटसमन्वयक सत्यवान शहारे ,मुख्याध्यापिका रेखा गोंडाने, केंद्रप्रमुख सु.मो. भैसारे, विषय साधन व्यक्ती चंद्रशेखर ढोके, विजय मेश्राम,त्रिवेणी रामटेके, पडोळे मॅडम यांचे प्रमुख उपस्थितीत थाटात संपन्न झाले.
सदर मेळाव्यात भाषा आधारित परिपाठ,मराठी भाषा दिन वाचन कोपरा,वाचन उत्सव वाचन उपक्रम ,निपुण वर्ग सजावट स्पर्धा व भाषा समृद्धी संचातील साहित्यांचा वापर , निपुण अभियान अंतर्गत शिक्षक निर्मित साहित्य प्रदर्शन शाळा निपुण होण्यासाठी केल्या गेलेल्या उत्तम कृती, त्यासाठी येणाऱ्या अडचणी आवश्यक मदत यावर वरिष्ठ विस्तार अधिकारी अनिल चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. सदर निपुणोत्सव उपक्रमात 15 केंद्रातील , केंद्र स्तरावर प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त शिक्षकांनी सहभाग झाले होते तसेच व्यवस्थापन समिती सदस्य यांना सहभाग करून घेण्यासाठी पाचारण करण्यात आलेले होते .
तालुका अर्जुनी मोरगाव निपूणोत्सव उपक्रमात केंद्रातील सर्व शिक्षकांनी उस्फूर्त सहभाग दर्शवून, विविध शैक्षणिक साहित्याची निर्मिती करून, त्या शैक्षणिक साहित्यांचा अध्ययन-अध्यापनामध्ये विद्यार्थ्यांचे वाचन ,लेखन ,संख्याज्ञान यावर उत्कृष्ट आधारित सादरीकरण केले.सदर जिल्हा स्तरीय निपुणोत्सव कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी , कु.गुंफेश बिसेन स.शि.केशोरी, सुनंदा येल्ले जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मुंगली शारदा किसन कापगते, जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा परसोडी/ रयत निबंध स्पर्धेमध्ये एम व्ही येरने, जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा ,चापटी तर उपक्रमशील शिक्षक म्हणून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा अर्जुनी मोर क्रमांक १चे सहाय्यक शिक्षक नरेंद्र बनकर उपक्रमशील केंद्रप्रमुख म्हणून सु. मो.भैसारे यांना जिल्हा स्तर पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले.
प्रस्तुत निपुणोत्सव उपक्रमाचे प्रास्ताविक पर भाषण गटसमनव्यक सत्यवान शहारे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम गहाणे व आभार प्रदर्शन केंद्रप्रमुख सु.मो.भैसारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वामन घरतकर, व्ही.बी. भैसारे, जितेंद्र ठवकर, पुरुषोत्तम गहाणे, अचला कापगते, रेवानंद उईके आदींनी सहकार्य केले .शेवटी वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

रायगड लोकसभा मतदारसंघांसाठी ७ मे रोजी मतदान

0
रायगड दि 18- भारत निवडणूक आयोगाने  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 चा कार्यक्रम जाहिर केला आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 48  लोकसभा मतदारसंघ असून 32 रायगड लोकसभा मतदार संघासाठी तिसऱ्या टप्प्यात दि 7 मे रोजी मतदान होणार आहे. यासाठीचे नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक 12 एप्रिल पासून सुरु होईल. जिल्ह्यात आजपासून आचारसंहिता लागू झाली असून निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडावी यासाठी आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीवर भर दिला जाणार असल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी तथा रायगड लोकसभा मतदार संघांचे निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या पत्रकार परिषदेस पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिप मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे आदी उपस्थित होते.
निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे
32- रायगड लोकसभा मतदार संघाची तिसऱ्या टप्प्यात निवडणूक होणार आहे.
 शुक्रवार 12 एप्रिल रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे.
नामनिर्देशन पत्रे सादर करण्याची अंतिम तारीख 19 एप्रिल आहे.
 नामनिर्देशन पत्राची छाननी 20 एप्रिल रोजी तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 22 एप्रिल आहे.
मतदान 7 मे होणार असून मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे.
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा कालावधी 6 जून पर्यंत आहे.
 रायगड जिल्ह्यात एकूण 2 हजार 694 मतदान केंद्र असून रायगड लोकसभा मतदार संघत 2 हजार 185 मतदान केंद्र आहेत. निवडणूक कामासाठी पुरेसे मनुष्यबळ जिल्ह्यात उपलब्ध आहे. एकूण 27 हजार कर्मचारी असून प्रत्यक्ष कामकाजसाठी 13 हजार 470 मनुष्यबळ आवश्यक आहे.
मतदार संघाचे एकूण मतदार
रायगड लोकसभा मतदार संघात पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड, हे रायगड जिल्ह्यातील तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि गुहागर हे लोकसभा मतदार संघ आहेत.
रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत, आणि उरण हे विधानसभा मतदार संघ 33- मावळ लोकसभा मतदार संघात आहेत.
रायगड मतदार संघात एकूण 16 लाख 53 हजार 935 मतदार आहेत. यामध्ये पुरुष 8लाख 13 हजार 515 मतदार तर महिला 8 लाख 40 हजार 416 मतदार तर तृतीय पंथी 4 आहेत. तर दिव्यांग 8 हजार 46 तर 18 -19 वयोगटातील 16हजार 288 मतदार आहेत. तर 85 पेक्षा अधिक वयोगटातील 31 हजार 28 मतदार आहेत.
नागरिकांच्या सोयीसाठी विविध ॲप; तक्रार करण्यासाठी स्वतंत्र ॲप 
या निवडणुकीत cVIGIL ॲपचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोणत्याही सामान्य नागरिकाला जर निवडणुकीत काही अफरातफर दिसून आली तर या ॲपवर जाऊन त्याची माहिती द्यायची आहे. फोटो अपलोड करण्याचीही सुविधा आहे. ज्या व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे त्याच्या लोकेशनवरून निवडणूक आयोगा सदर परिसराचा माग काढेल आणि १०० मिनिटांच्या आत आयोगाचे पथक त्याठिकाणी दाखल होईल.
मतदारसंघातील उमेदवारांची माहिती मिळवायची असेल तर मतदारांना Know Your Candidate (KYC-ECI) या ॲपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राजकीय जाहिरातींच्या प्रसारण पूर्व प्रमाणीकरणासाठी सर्व संबंधित राजकीय पक्ष ‘माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडे संपर्क करतील. त्यानुषंगाने आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे.
निवडणुकीसाठी जिल्हा यंत्रणा सज्ज
स्वतंत्र आणि निशपक्ष निवडणूक घेण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. निवडणुक कर्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 22 समित्या नेमण्यात आल्या आहेत. तसेच मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहेत. तसेच जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यामध्ये समाजातील सर्व घटकांचा समावेश करण्यात येणार आहे.
काय करावे, काय करू नये
निवडणूका घोषित झाल्यापासून ते निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत उमेदवार आणि राजकीय पक्ष यांच्या मार्गदर्शनासाठी “काय करावे” आणि “काय करु नये” याबाबतची अंमलात आणावयाची तत्वे :
*काय करावे*
(१) निवडणुका घोषित होण्यापूर्वी क्षेत्रात प्रत्यक्षपणे सुरु करण्यात आलेले कार्यक्रम पुढे चालू ठेवता येतील.
(२) पूर, अवर्षण, रोगाची घातक साथ किंवा इतर नैसर्गिक आपत्ती यांच्यामुळे प्रभावित झालेल्या क्षेत्रांतील जनतेसाठी पिडानिवारण आणि पुनर्वसन कार्य सुरु करता व चालू ठेवता येऊ शकेल.
(३) मरणासन्न किंववा गंभीररित्या आजारी असलेल्या व्यक्तींना उचित मान्यतेने रोख रक्कम किंवा वैद्यकीय सुविधा देणे चालू ठेवता येऊ शकेल.
(४) मैदानांसारखी सार्वजनिक ठिकाणे निवडणूक सभा घेण्यासाठी सर्व पक्षांना / निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निःपक्षपातीपणे उपलब्ध झाली पाहिजे. त्याचप्रमाणे हेलिपॅडचा वापरही सर्व पक्षांना / निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निःपक्षपातीपणे करता आला पाहिजे.
(५) इतर राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्यावरील टीका, त्यांची धोरणे, कार्यक्रम पूर्वीची कामगिरी आणि कार्य यांच्याशीच संबंधित असावी.
(६) शांततापूर्ण आणि उपद्रवरहित गृहस्थजीवन जगण्याचा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार पूर्णपणे जतन करण्यात यावा.
(७) स्थानिक पोलीस प्राधिकाऱ्यांना प्रस्तावित सभांची जागा आणि वेळ याबाबत पुरेशी आगाऊ सूचना देऊन आवश्यक ती परवानगी घेतलेली असावी.
(८) प्रस्तावित सभेच्या जागी कोणतेही निबंधक किंवा प्रतिबंधक आदेश जारी केलेले असल्यास त्याचे पूर्णपणे पालन करण्यात यावे. आवश्यक असल्यास याबाबत सूट मिळण्याकरीता अर्ज केला पाहिजे आणि अशी सूट वेळीच मिळवावी.
(९) प्रस्तावित सभेसाठी ध्वनिवर्धकाचा वापर करण्याची आणि अशा इतर कोणत्याही सुविधांसाठी परवानगी मिळवावी
.(१०) समांमध्ये अडथळे आणणाऱ्या किंवा अन्यथा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या व्यक्तींचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात यावी.
(११) मिरवणूक सुरु होण्याची वेळ आणि जागा, ती जेथून जाणार असेल तो मार्ग आणि ती जेथे संपणार असेल ती वेळ आणि जागा अगोदर निश्चित करण्यात येईल आणि पोलीस प्राधिकाऱ्यांकडून त्यासाठी आगाऊ परवानगी घेण्यात यावी.
(१२) मिरवणूक जेथून जाणार असेल त्या भागांमध्ये कोणताही निर्बंधक आदेश जारी असल्यास, त्याबाबत खात्री करुन घेऊन, त्याचे पूर्णपणे अनुपालन करण्यात यावे. त्याचप्रमाणे वाहतूक विनियम आणि इतर निर्बंध यांचेही अनुपालन करण्यात यावे.
(१३) मिरवणुकीमुळे वाहतुकीला अडथळा होऊ देऊ नये.
(१४) मतदान शांततापूर्ण आणि सुनियोजितरीतीने पार पडावे यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांना नेहमीच सहकार्य करावे.
(१५) सर्व कार्यकर्त्यांनी बिल्ले व ओळखपत्र ठळकपणे लावावीत.
(१६) मतदारांना पुरविण्यात आलेल्या अनौपचारिक ओळखचिठ्ठया साध्या (पांढऱ्या) कागदावर असाव्यात आणि त्यावर कोणतेही चिन्ह, उमेदवाराचे नांव किवा पक्षाचे नांव असू नये.
(१७) प्रचाराच्या कालावधीमध्ये व मतदानाच्या दिवशी वाहने चालविण्यावरील निर्बंधांचे पूर्णतः पालन करण्यात यावे.
(१८) मतदार, उमेदवार व त्यांचे निवडणूक / मतदान प्रतिनिधी यांव्यतिरिक्त फक्त निवडणूक आयोगाकडून वैध प्राधिकारपत्र मिळविलेल्या व्यक्तींनाच कोणत्याही मतदान कक्षात प्रवेश करता येईल. इतर व्यक्ती कितीही उच्चपदस्थ असली तरी (उदा. मुख्यमंत्री, मंत्री, खासदार किंवा आमदार इत्यादी) तिला अटीतून सूट मिळणार नाही.
(१९) निवडणुका घेण्याविषयीची कोणतीही तक्रार किंवा समस्या, आयोग / निवडणूक निर्णय अधिकारी / क्षेत्र / प्रक्षेत्र दंडाधिकारी / भारत निवडणूक आयोग यांनी नियुक्त केलेल्या निरिक्षकांच्या निदर्शनास आणून देण्यात याव्यात.
(२०) निवडणूक आयोग, निवडणूक निर्णय अधिकारी / जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे निवडणूकीच्या विविध पैलूंशी संबंधित असलेल्या सर्व बाबींविषयचे निदेश / आदेश / सूचना यांचे पालन करण्यात यावे.
(२१) आपण एखाद्या मतदारसंघातील मतदार किंवा उमेदवार किंवा त्या उमेदवाराचा निवडणूक प्रतिनिधी नसाल तर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर आपण त्या मतदारसंघातून निघून जावे.
काय करु नये
(१) सत्ताधारी पक्ष / शासन यांनी केलेल्या कामगिरी विषयी सरकारी राज्यकोषातील खर्चाने कोणतीही जाहिरात काढण्यास प्रतिबंध आहे.
(२) कोणताही मंत्री उमेदवार असल्याशिवाय किंवा फक्त मतदानासाठी मतदार म्हणून आला असेल त्याशिवाय मतदान कक्षात किंवा मतमोजणीच्या जागी प्रवेश करणार
नाही.
(३) शासकीय कामाची निवडणूक मोहिम / निवडणूक प्रचार कार्यासोबत सरमिसळ करू नये.
(४) मतदाराला, पैशाचे किंवा अन्य कशाचेही प्रलोभन दाखवू नये.
(५) मतदारांच्या जातीय समूह भावनांना आवाहन करु नये.
(६) वेगवेगळ्या जाती, समूह किंवा धार्मिक किंवा भाषिक गट यांच्यामधील विद्यमान मतभेद वाढवील किंवा परस्पर द्वेष किंवा तणाव निर्माण करील अशी कोणतेही कृती करण्याचा प्रयत्न करु नये.
(७) इतर पक्षांचे नेते किंवा कार्यकर्ते यांच्या सार्वजनिक जीवनाशी संबंधित नसलेल्या खाजगी आयुष्याच्या कोणत्याही पैलूवर टीका करण्यात येऊ नये.
(८) इतर पक्ष किवा त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर, आंधळेपणाने केलेले आरोप आणि विपर्यस्त माहिती यांच्या आधारावर टिकाटिप्पणी करु नये.
(९) देवळे, मशिदी, चर्च, गुरुद्वार किंवा इतर कोणतेही प्रार्थनास्थळ यांचा वापर निवडणूक प्रचाराची भाषणे, भित्तीपत्रके, संगीत यांच्यासह निवडणूक प्रचाराची जागा म्हणून केली जाणार नाही.
(१०) मतदारांना लाच देणे, मतदारांवर गैरवाजवी दडपण, मतदारांना धाकदपटशा दाखविणे, तोतयेगिरी, मतदान केंद्रापासून १०० मीटर्सच्या आत प्रचार करणे, मतदान समाप्त करण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेच्या आधीच्या ४८ तासात सार्वजनिक सभा घेणे आणि मतदारांची मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करणे यासारख्या भ्रष्ट आणि निवडणूक अपराध समजल्या जाणाऱ्या गोष्टीना मनाई आहे
(११) लोकांच्या मतांचा किंवा त्यांच्या कामांचा निषेध करण्यासाठी त्यांच्या घरासमोर निदर्शने करणे किंवा धरणे धरणे यांचा कोणत्याही परिस्थितीत अवलंब केला जाणार नाही.
(१२) स्थानिक कायद्यांच्या अधीन राहून, कोणत्याही व्यक्तीची जमीन, इमारत, आवार भिंत, वाहने इत्यादींच्या मालकाच्या विशिष्ट परवानगीशिवाय ध्वजदंड उभारण्यासाठी, निशाण्या लावण्यासाठी, सूचना चिकटविण्यासाठी, घोषणा लिहिण्यासाठी कोणीही वापर करणार नाही. (असे साहित्य आढळून आल्यास ते निवडणूक अधिकारी यांच्या निदर्शनास आणून त्यांच्याकडे जमा करावे) यामध्ये खाजगी व सार्वजनिक मालमत्ता या दोहोंचाही समावेश आहे.
(१३) इतर राजकीय पक्ष आणि उमेदवार यांनी आयोजित केलेल्या सार्वजनिक सभा किंवा मिरवणुका यांच्यामध्ये कोणताही अडथळा निर्माण करु नये.
(१४) ज्या ठिकाणी इतर पक्षांच्या सभा घेतल्या जात असतील अशा ठिकाणांहून मिरवणूक नेऊ नये.
(१५) मिरवणुकीतील लोकांनी, क्षेपणास्त्र किंवा शख म्हणून ज्याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो अशा कोणत्याही वस्तू जवळ बाळगू नयेत.
(१६) इतर पक्षांनी व उमेदवारांनी लावलेली भित्तीपत्रके काढून टाकू नयेत अथवा विद्रुप करु नयेत.
(१७) मतदानाच्या दिवशी ओळखचिठ्ठया वाटपाच्या ठिकाणी किंवा मतदान कक्षाच्या जवळ भित्तीपत्रके, ध्वज, चिन्हे आणि इतर प्रचार साहित्य यांचे प्रदर्शन करु नये.
(१८) ध्वनिवर्धकांचा सकाळी ६-०० पूर्वी किंवा रात्री १०-०० नंतर आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय वापर करण्यात येऊ नये.
(१९) संबंधित प्राधिकाऱ्याच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय, सार्वजनिक सभा आणि मिरवणूका यांच्या मध्येही ध्वनिवर्धकाचा वापर करण्यात येऊ नये. सर्वसाधारणपणे अशा सभा / मिरवणुका रात्री १०-०० नंतर चालू ठेवण्याची परवानगी देण्यात येऊ नये आणि त्याशिवाय त्याचा वापर स्थानिक कायदे, त्या जागेच्या सुरक्षा व्यवस्थेचे प्रत्यक्ष ज्ञान आणि हवामानाची स्थिती, सणासुदींचा मोसम, परीक्षेचे दिवस इत्यादींसारख्या परिस्थितीच्या अधीन असेल.
(२०) निवडणुकीच्या काळात दारुचे वाटप केले जाणार नाही.
(२१) ज्या व्यक्तीच्या सुरक्षिततेला धोका असल्याबाबत खात्री पटली आहे आणि म्हणून तीला सरकारी सुरक्षा पुरविण्यात आली आहे. अशी कोणतीही व्यक्ती, मतदानाच्या दिवशी, त्याच्या सुरक्षा कर्मचारीवर्गासह मतदान केंद्र असलेल्या जागेच्या परिसरात (१०० मीटर्सच्या आत) प्रवेश करणार नाही. तसेच, अशी कोणतीही व्यक्ती, मतदानाच्या दिवशी, त्याच्या सुरक्षा कर्मचारीवर्गासह मतदारसंघामध्ये फिरणार नाही. जर, सरकारी सुरक्षा पुरविलेली व्यक्ती, मतदार असेल तर, केवळ मतदान करण्यासाठी सोबत असलेल्या सुरक्षा कर्मचारीवर्गासह त्याच्या / तिच्या ये-जा करण्यावर निर्बंध घालील.
(२२) ज्या व्यक्तीच्या सुरक्षिततेला धोका असल्याबाबत खात्री पटली आहे आणि म्हणून तिला सरकारी सुरक्षा पुरवली आहे किंवा त्या व्यक्तीकडे खाजगी सुरक्षा रक्षक आहेत अशा कोणत्याही व्यक्तीची निवडणूक प्रतिनिधी किंवा मतदान प्रतिनिधी किंवा मतमोजणी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात येऊ नये.
टीप :- “काय करावे” किंवा “काय करु नये” यांची वरील सूची केवळ वानगीदाखल असून सर्वसमावेशक नाही. वरील विषयावरील इतर तपशीलवार आदेश, निदेश / सूचना यांना पर्यायी असणार नाही. त्यांचे काटेकोरपणे पालन करावेच लागेल. शंका असल्यास भारत निवडणूक आयोग / राज्य मुख्य निवडणूक अधिकारी यांचे मार्गदर्शन / मंजूरी घेणे आवश्यक आहे. आयोगाच्या वरील सूचनांचे काटेकोर पालन करण्यासाठी सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून देण्याची दक्षता घ्यावी.

पक्षाने संधी दिल्यास विलास राऊत लोकसभा निवडणूक लढवतील

0
* *बसपच्या वरिष्ठांची भेट घेऊन भंडारा लोकसभा जागेसाठी दावा मांडला
गोंदिया- माजी प्रदेश चिटणीस व बहुजन समाज पक्षाचे झोन प्रभारी विलास राऊत यांनी आज बसपचे राज्यस्तरीय नेते व विदर्भ प्रदेश प्रभारी यांची नागपूर येथील विभागीय पक्ष कार्यालयात भेट घेऊन बहुजन समाज पक्षाकडून उमेदवारी मिळण्याचा दावा व्यक्त केला.
           बसपाच्या जुन्या कार्यकर्त्यांपैकी एक आशी विलास राऊत यांची प्रचिति आहे, कुशल संघटक, आक्रमक, प्रभावी वक्ता, मनमिळाऊ मृदुभाषी कार्यकर्ता म्हणून पक्षात ओळखले जातात, आणि ते बसप मध्ये विविध उच्च पदांवर कार्यरत राहिले, ज्यामुळे ते दोन्ही जिल्ह्य़ातील कार्यकर्त्यांना  परिचित आहेत.
         एक प्रभावी वक्ते असण्याबरोबरच त्यांचा समाजात आदर आणि नावलौकिक आहे.नक्कीच त्यांची उमेदवारी पक्षासाठी नवसंजीवनी देणारी ठरू शकते.पक्षाने उमेदवारी दिल्यास निश्चितपणे निवडणूक लढवणार असल्याचे विलास राऊत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

हत्तीरोग दुरीकरण मोहिमेची व्यापक जनजागृती करा- एम. मुरुगानंथम

0
  • चार तालुक्यात 26 मार्च पासून हत्तीरोग दूरीकरण मोहीम

     गोंदिया, दि.18 : हत्तीरोग हा एक सुतासारख्या मायक्रोफायलेरिया कृमीमुळे होणारा रोग आहे. याचा प्रसार क्युलेक्स डासाच्या मादीमुळे होतो. क्युलेक्स डासाची मादी माणासास चावल्यामुळे हत्तीरोगाच्या कृमीचा शरीरात प्रवेश होऊन अंगावर खाज येणे, पुरळ येणे, वारंवार ताप येणे इत्यादी लक्षणे सुरुवातीस येतात व नंतर हातापायावर सूज येते. एकदा हत्तीरोग बळावल्यावर उपाय नाही. त्यामुळे हत्तीरोग दूरीकरणासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करावी, असे आवाहन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी केले.

         जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज हत्तीरोग दुरीकरणाबाबत जिल्हा समन्वय समितीची सभा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी मार्गदर्शन करतांना श्री. मुरुगानंथम बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, पोलीस उपअधीक्षक (गृह) नंदिनी चानपूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे, जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) गोविंद खामकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) संजय गणवीर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

         एम. मुरुगानंथम म्हणाले, आरोग्य विभागाने सर्व्हेक्षण केल्यानंतर जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा, गोरेगाव व अर्जुनी मोरगाव या तालुक्यात सर्वात जास्त हत्तीरोग रुग्ण आढळल्यामुळे या चार तालुक्यात 26 मार्च 2024 पासून हत्तीरोग दूरीकरण मोहिम सुरु होणार असून सदर मोहीम दहा दिवस चालणार आहे. हत्तीरोग होऊ नये म्हणून डी.ई.सी. व अल्बेंडाझॉल गोळ्यांची फक्त एक मात्रा वर्षातून एकदा सलग पाच वर्षे घेतल्यास हत्तीरोग होत नाही. त्यामुळे हत्तीरोगाचा प्रसार होणे थांबतो, पर्यायाने आपण स्वतः व भावी पिढी हत्तीरोगापासून मुक्त करु शकतो. सदर मोहीम यशस्वी करण्याच्या दृष्टीने व समाजात नविन रोगी होऊ नये याबाबत नागरीकांनी सहकार्य करुन गोळयांची एक मात्रा सेवन करावी. हत्तीरोगाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वांना डी.ई.सी. व अल्बेंडाझॉल गोळ्या खाऊ घालणे आवश्यक आहे. हत्तीरोग जंतूच्या विशिष्ट सवयीमुळे हे जंतू मानवी रक्तात रात्री मोठ्या प्रमाणात आढळतात, त्यामुळे रात्री रक्त नमूना घेवून तपासणी केल्यानंतर हत्तीरोगाचे निदान करता येते. सदर मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागाने आपसात समन्वय ठेवून काम करावे. घरातील एकही व्यक्ती या उपचारापासून वंचित राहणार नाही याची आरोग्य विभागाने खबरदारी घ्यावी. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या गृहभेटीत त्यांना घरात हत्तीरोग रुग्ण आढळल्यास त्याची माहिती द्यावी असे सांगून ते पुढे म्हणाले की, घराच्या आजुबाजूला साचलेल्या सांडपाण्याची विल्हेवाट लावावी, शक्य असल्यास रॉकेल तेल टाकावे. सेप्टीक टँकच्या व्हेंट पाईपला कापड बांधावे. वापरात नसलेल्या पडक्या विहिरी व डबके यामध्ये डास अळी भक्षक गप्पी मासे सोडावेत. उघड्यावर झोपू नये, डासापासून संरक्षणासाठी मच्छरदाणीचा वापर करावा. मैला, घाण, कचरा इत्यादींची योग्य पध्दतीने विल्हेवाट लालावी. घराच्या दारे-खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळी बसवावी. हत्तीरोगाचा संसर्ग रोखण्यासाठी आणि डासांचे जीवनचक्र खंडीत करण्यासाठी साचलेल्या पाण्यात गप्पीमासे सोडावेत. पाण्याच्या टाक्या, रांजण, हौद यांना व्यवस्थित झाकणे बसवावीत, वेळोवेळी त्यांची स्वच्छता करावी. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळण्यात यावा. डासांचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी फॉगींग करण्यात यावी. शिक्षण विभागाने सर्व शाळांमध्ये याबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करावी. अंडवृध्दी असलेल्या रुग्णांनी आरोग्य संस्थेत मोफत शस्त्रक्रिया करुन घ्यावी असे त्यांनी सांगितले.

        सभेला जिल्हा क्षयरोग अधिकारी वेदप्रकाश चौरागडे, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) अशोक लांडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.भारती जयस्वाल, जिल्हा परिषदेचे आय.ई.सी.अधिकारी प्रशांत खरात यांचेसह सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.