भारतात हॉलमार्कचे दागिने शुद्ध नाहीत

0
19

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, दि.31- भारतात हॉलमार्क सोन्याचे दागिन्यांची शुद्धता विश्वासपात्र नसल्याचे वर्ल्ड गोल्ड काउंसिलने गुरुवारी जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे. यामुळे हॉलमार्किंग सोन्याच्या दागिन्यांच्या शुद्धतेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असताना विना हॉलमार्किंग दागिन्यांचे काय? अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. हॉलमार्किंग दागिने देशातील फक्त मोठ्या शहरात मिळतात. मात्र, छोट्या शहरात किंवा गावांमध्ये विना हॉलमार्किंग दागिने विक्री केले जातात.

वर्ल्ड गोल्ड काउंसिलच्या अहवालानुसार, भारतातील हॉलमार्कचे दागिन्यांची शुद्धता ‘ग्लोबल स्टँडर्ड’सारखी नाही.यामुळे अनेक देशांचा भारतातील सोन्याच्या दागिन्यांच्या शुद्धतेवर विश्वास राहिलेला नाही. त्याचा सरळ परिणाम निर्यातीवर झाला आहे.

भारतात 30 टक्क्यांपेक्षा कमी हॉलमार्कचे दागिने आहेत. विशेष म्हणजे भारतातील हॉलमार्कचे सोने 100 टक्के शुद्ध नाही. देशात जवळपास 4 लाख दागिने हॉलमार्किंग आहेत. हॉलमार्किंग प्रणालीत प्रचंड चूका असल्यामुळे भारतीय मानक ब्युरोच्या (बीआयएसआय) नियमावलीत ते खरे उतरत नसल्याचे स्पष्‍ट झाले आहे.

भारतीय मानक ब्युरोचा लोगो, शुद्धतेचे कॅरेट, ज्या सेंटरमध्ये हॉलमार्किंग झाले त्याचा शिक्का, ज्या दुकानातून खरेदी केली त्या दुकानाचा शिक्का आणि ज्या वर्षी हॉलमार्किंगचा उल्लेख असावा. हॉलमार्कच्या दागिन्यांवर हे पाच शिक्के असणे गरजेचे आहे. अनिवार्य असते. देशात 2000 पासून ही पद्धत सुरु झाली आहे. सुरुवातीला ‘A’ हा सिम्बॉल देण्यात आला होता. त्यानुसार 2012 साठी ‘M’ हा सिम्बॉल देण्यात आला आहे.

वर्ल्ड गोल्ड काउंसिलनुसार, हॉलमार्किंग प्रणाली बिनचूक झाल्यास पाच वर्षांत देशातील सोन्याच्या दागिन्यांचे एक्सपोर्ट 8 वरून वाढून 40 अब्ज डॉलर्सवर पोहोचेल. गोल्ड मॉनेटायझेशन स्कीमला देखील लाभ मिळेल.

काय आहे अहवालात…
> देशात 30 टक्के हॉलमार्क दागिन्यांची विक्री होते.
> ग्रामीण भारतात हॉलमार्किंगला कोणी ओळखत नाही. सुशिक्षित लोकांमध्येही 50 टक्के लोक हॉलमार्किंग दागिने खरेदी करतात.
> नव्या हॉलमार्किंग सेंटरला टॅक्समध्ये सूट देण्यात यावी. दागिन्यांसाठी रेटिंग सिस्टम बनवावी. हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात यावे.
देशात एकूण 316 हॉलमार्किंग सेंटर्स आहेत. तमिळनाडुमध्ये 58, राजस्थानमध्ये 11, उत्तर भारतात 111, पश्‍चिम भारतात 65 सेंटर्स आहेत. मध्यप्रदेशात सर्वात कमी चार तर सर्वाधिक 153 सेंटर्स दक्षिण भारतात आहेत.