वरिष्ठांच्या नावावर श्रीमती जाधव घ्यायच्या पैसा

0
26

आलोक मोहंती यांचा पत्रकार परिषदेत आरोप

गोंदिया, दि.५-येथील स्थानिक स्तर लघू qसचन उपविभाग गोंदियाच्या तत्कालीन उपविभागीय अभियंता श्रीमती सोनिया जाधव यांच्या कमीशनवृत्तीमूळे त्रस्त असलेल्या काही ठेकेदांरानी केलेल्यास्टींगमध्ये वरिष्ठ तसेच सहकारी अधिकारी यांच्यानावावर बिल काढून देण्यासाठी पैशाची मागणी करीत असल्याची तक्रार सीडी स्वरूपात आपल्याकडे आली.त्या आधारावर कार्यकारी अभियंता निखाडे यांच्याशी भेट घेऊन चर्चा करून त्यांच्यावर कारवाईची मागणी केल्याची माहिती कोहरामचे सपांदक आलोक मोहंती यांनी पत्रकारपरिषदेत दिली.
मोहंती यांनी सांगितले की,मोनू सावंत आणि शिरीष धपाडे यांनी बंधाèयाचे देयके अनेक दिवसापासून काम पूर्ण होऊनही श्रीमती जाधव काढत नसल्याची लेखी तक्रार दिली.त्या आधारे मी कार्यकारी अभियंता निखाडे यांची भेट घेण्यासाठी गेलो.तसेच त्यांनी सीडी आणि तक्रार देत कारवाईची मागणी केली.त्यावर निखाडे यांनी श्रीमती जाधव यांची आधीच चौकशी सुरू असून त्यांची बदली सुध्दा झाली आहे.त्यांना यासंदर्भात मी त्यांना विचारणा करेन असे सांगितले.त्यानंतर आपण कार्यालयात सरळ आपल्या कार्यालयात आलो,माझे आणि श्रीमती जाधव यांची भेट सुध्दा झालेली नाही किंवा त्यांच्यासोबत बोलणेही झालेले नसतांना माझ्याविरुद्द आकसापोटी पोलिसात खोटी तक्रार करून आपल्या कार्यकाळातील गैरव्यवहार तसेच बांधकामाच्या बिलासाठी घेण्यात येणाèया कमीशनच्या पैशांना उधारीचे पैसे दाखवून शासनाची सुध्दा फसवणूक करीत असल्याचा आरोप केला.या सर्व प्रकरणात सोनिया जाधव यांच्या सर्वसंपतीची तपासणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फेत करण्यात यावी अशी मागणी तसेच त्यांची पूर्ण चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री,अधीक्षक अभियंता यांना केल्याची माहिती दिली.पोलिसांनी कुठलाही पुरावा नसताना आणि आपली बाजू न एैकताच अधिकारी महिला म्हणून त्यांच्या खोट्या तक्रारीवर आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.आपण पोलिसांनाही याप्रकरणी आधी चौकशी करण्याची विनंती केली परंतु त्यांनीही त्याकडे कानाडोळा केल्याचे सांगत याप्रकरणी आपण न्याय मिळेपर्यंत शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे मोहंती यांनी सांगितले.पत्रपरिषदेला संदीप ठाकूर,कंत्राटदार मोनू सावंत,शिरीष धपाडे हे सुध्दा उपस्थित होते.
दरम्यान कार्यकारी अभियंता निखाडे यांना याप्रकरणाबद्दल विचारणा केली असता त्यांनी तक्रार आली असून आपण स्पष्टीकरणासाठी पत्र दिल्याचे सांगितले.तसेच श्रीमती जाधव यांची चौकशी सुरू असल्याचे सांगितले.
याप्रकरणाबद्दल श्रीमती सोनिया जाधव यांची प्रतिक्रिया जाणूनघेण्यासाठी त्यांच्याभ्रमणध्वनीवर संपर्क केला असता त्यांनी आपण पोलीस तक्रारीत सर्व काही दिल्याचे सांगत,आपली प्रकृती बरी नसल्याने अ‍ॅडमीट असल्याचे सांगितले.

कंत्राटदारांनी केलेल्या स्टींगमधील काही समजू शकतील असे काही संभाषणाचा भाग

श्रीमती सोनिया जाधव यांच्या घरातील हे संभाषण
श्रीमती जाधव-सगळ्यांचे वेगवेगळे विषय आहे,दतोराची तक्रार आहे,पण काम झाले आहे.
ठेकेदार-मॅडम अलताफने तक्रार केली दतोराची,माझे देवरीच्या कामाचेही पैसे लटकले.खूप टेंशन येते.झोप लागत नाही.
श्रीमती जाधव -टेंशन घेत नको जाऊ,रात्री झोपत जा,तुझ्यासारखी परिस्थिती आमचीही आहे.मला तर सर्व साभांळावे लागते.मी त्याला पाठवते तो सध्या हॉस्पिटलला गेला आहे.
ठेकेदार-मॅडम तो मेहनत करतो,उन्हातान्हातही फिरतो.पण टेस्टींगचे काय
श्रीमती जाधव-टेस्टींगचे बघावेच लागेल रहागंडाले तर आज नाहीत,ते भंडारा गेले
ठेकेदार-एक हप्ता लावला मॅडम
एवढ्यात एक फोन श्रीमती जाधव यांना येतो
त्यावर श्रीमती जाधव फोनवर बोलतांना ग्रामपंचायतने ठराव कशाला दिले,बंधारा पाहिजे म्हणून आता असे नाही चालणार.
ठेकेदार-मॅडम ग्रा.पं.का एैसा ही रहता है.इसके लिये ग्रामसभा का ठराव होना.गाव मे दो पार्टी रहती है तब सातबारासे लेकर सब लेकर आने को बोलना.उसे नहा ले बोलना थंडे पाणी से
पठाणबाबू बता रहा था
श्रीमती जाधव-बिल का क्या हुआ वो तो रेडी है बताया रहागंडाले साहाब देखेंगे
ठेकेदार-१० लाया हू कैसे भी देख लो
श्रीमती जाधव-मागच्यावेळी क्लियर केले असते,तर फायनल बिल निघाले असते
ठेकेदार-मॅडम कुठेही बिल निघाले तेव्हाच देतात,आम्ही एमजेपी,पीडब्लूडीमध्येही बिल निघाल्यानंतरच देतो.देवगडे साहेबांना नाही दिले त्यांनंी एक टक्का रक्कम वाढवून मागितली होती.qपटू मानेला बावनकर साहेबांनी सहकार्य केले.
श्रीमती जाधव-qपटू मानेंचा एक बिल केले त्यांनी दिले होते,तिरोडावाल्यानी व इतर काहींनी नाही दिले.
ठेकेदार-गणेशभैय्या बोल रहे थे बावनकर साहेबांना देतो म्हणे पैसा.बीलवील का प्रोफार्म है मुझे आता है बनाना प्रोफार्म है मेरे पास
श्रीमती जाधव-मुझे आयडीया होना,बतांना मुझे और प्रोफार्म देना
ठेकेदार-गजभियेजी को बोला प्रोफार्म लाया
श्रीमती जाधव-निखाडे साहेबांचा तेवढा काही नाही,मी बघून घेईन.गजभियेची नागपूरला बदली होत आहे,तो त्यामध्ये आहे.
ठेकेदार -वाघमारेला विचारा
श्रीमती जाधव-बावनकरच्या हातात पैसे पाठविले होते.
ठेकेदार-देवगडे,बावनकर यांचे दिले होते
श्रीमती जाधव-पाठवून द्या.त्यांचे काही टेंशन नाही.ईई.देतात त्यांच्यास्वाक्षरीशिवाय सेक्युरिटी निघत नाही.निखाडे साहेबांना मी बोलून देते.
श्रीमती जाधव -टेस्टींग रिर्पोट घेऊन ये
ठेकेदार- मॅडम आवश्यकता नाही
श्रीमती -जाधव जुर्ले का टेस्टींग रिपोट लेकर आ
ठेकेदार -मॅडम बारीश होती है काम नही होता
श्रीमती जाधव- कुछ नही होता टेस्टींग ला
ठेकेदार- टेस्टींग ही ला बोलती है
श्रीमती जाधव यांचे कार्यालय
श्रीमती जाधव -दीड वर्षापासून किती काम झालेय
ठेकेदार- दिवाळीच्या दोन महिने आधी निघाले होते बिल नंतर निघाले नाही
श्रीमती जाधव-गजभिये साहेब आले होते
ठेकादर -बावनकर साहेब को बोला था काम पुरा हो गया
श्रीमती जाधव -मी एडजस्ट करते,भावनिक गोष्टींचा लढा होतो
दमाहेचा बिल कधी दिले,तुम्ही लोक नाही समजू शकणार
ठेकेदार –
श्रीमती जाधव-मी स्वत आजारी होते,कार्यकारी अभियंत्याचा जागा निघाल्या माझा इंटरव्युव नाही झाला