शिक्षण सभापतींनी दिली एकोडी शाळेला भेट

0
9

गोंदिया,दि.21-गोंदिया जिल्हा परिषदेतंर्गत येत असलेल्या गोंदिया तालुक्यातील एकोडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी.कटरे यांनी आज शुक्रवारी भेट दिली.तसेच शाळेच्या इमारतीची पाहणी करुन तेथील मु्ख्याध्यापक,शिक्षकांशी चर्चा केली.यावेळी जिल्हा परिषद सदस्य रमेश अंबुले व गोंदियाच्या सभापती श्रीमती गौतम सोबत होत्या.