आता शिक्षक करणार ‘शिक्षक कल्याणङ्क निधी गोळा

0
33

सुरेश भदाडे
गोंदिया,दि. ३०-पाच सप्टेंबर हा सर्वपल्ली डॉ.राधाकृष्ण यांचा जन्मदिवस ‘शिक्षक दिनङ्क म्हणून साजरा केला जातो. यात मात्र यंदा थोडे बदल करण्यात आले असून या दिनानिमित्त आता शिक्षकांना ‘शिक्षक कल्याण निधीङ्क संकलित करण्याचा उपक्रम देण्यात आला आहे. यावर्षीचा शिक्षक दिन कसा साजरा करावयाचा यासाठी शालेय शिक्षण विभागाने २७ ऑगस्ट रोजी परिपत्रक काढले आहे. त्यानुसार शिक्षक दिनानिमित्त शिक्षक कल्याण निधी गोळा करण्याला प्राथमिकता देण्यात येणार आहे. याशिवाय या दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजनही केले जाणार असून यात विशेष शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे.
शिक्षक कल्याण निधी गोळा करण्यासाठी जिल्हा, पंचायत समिती, गाव, शहर पातळीवर समिती तयार करण्याच्या सूचना आहेत. शिक्षक दिन साजरा करण्यासाठी जनतेत जागृती व्हावी, यासाठी गावोगावी प्रचार व सभा घ्यावयाच्या आहेत. वातावरणाची निर्मिती तयार व्हावी म्हणून विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते व इतरांनी शिक्षक दिनाच्या समारंभात सहभागी व्हायचे आहे. शिक्षक निधी जास्तीत जास्त गोळा करण्याचे काम गावातील कार्यकत्र्यांमार्फत करावयाचे आहे. तथापि, शिक्षक कल्याण निधी विद्यार्थी, शिक्षकांनी देणगी देण्याबाबत सक्ती करण्यात येऊ नये, अशा स्पष्ट सूचना आहेत. शिक्षक दिनानिमित्त एक-दोन दिवस शालेय कला पथके, नाट्यमंडळे, सांस्कृतिक कार्यक्रम करणाèया व इतर संस्था यांना विनंती करून सांस्कृतिक व करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करावेत. त्याव्दारे शिक्षक कल्याण निधीसाठी रक्कम गोळा करण्याचा प्रयत्न करण्यात यावा. यादिवशी चित्रपटगृहातून, शाळांतून व इतर सार्वजनिक ठिकाणी शिक्षणासंबंधीचे करमणूक शुल्क माफ असलेले मराठी तसेच qहदी चित्रपट दाखविण्याची मुभा देण्यात आली आहे. शिक्षक दिनाच्या दिवशी चित्रपटगृहांमध्ये दाखविल्या जाणाèया चित्रपटाच्या खेळामधून जमा होणाèया उत्पन्नाचा काही भाग हा त्या कार्यक्रमासाठी देण्याबाबत चित्रपटगृहाच्या संचालकांना आयोजकांनी विनंती करावी. शिक्षक कल्याण निधीसाठी सामाजिक कार्यकत्र्यांनी प्रतिष्ठित नागरिकांकडून देणगी मिळविण्याचा प्रयत्न करावा. ग्राम शिक्षण समितीच्या बैठका शिक्षक दिनानिमित्त गावात घेण्यात याव्यात. या दिवशी खेळाचे सामने, योग वर्ग, लेजीम, कसरतीचे कार्यक्रम, कुस्त्या आदी उपक्रम आयोजित करावे. यातून काही उत्पन्न मिळाल्यास तो निधी शिक्षक कल्याण निधीमध्ये जमा करण्यात यावा. शिक्षक दिनानिमित्त राज्यातील सर्व महाविद्यालये, माध्यमिक शाळा, प्राथमिक शाळा, प्रशिक्षण केंद्राच्या प्रमुखांनी शिक्षक दिन उत्साहात साजरा करावा. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा व तालुका पातळीवरील सर्व कार्यालयाचे प्रमुख व सर्वांनी शिक्षक दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करावा. शिक्षक दिनानिमित्त निधीरूपात जमा होणारी रक्कम प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, व इतर कार्यालये यांनी शिक्षणाधिकारी qकवा शिक्षण प्रमुख, शिक्षक मंडळ, प्रशासन अधिकारी यांच्या कार्यालयात जमा करावी, शिक्षणाधिकारी व संबंधितांनी ती रक्कम स्टेट बँकेत त्या निधीचा डिमांड ड्राफ्ट सदस्य सचिव, खजिनदार महाराष्ट्र राज्य शिक्षण कल्याण निधी समिती व शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या नावे काढून शिक्षण संचालनालय पुणे या कार्यालयास पाठवावा, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, शिक्षक कल्याण निधी गोळा करण्यासाठी पाच रुपये किमत असलेला पांढèया रंगाचा कागदी बिल्ल्यांची विक्री करावयाची आहे. यासाठी राज्यात एकाच प्रकारचे कागदी बिल्ले छापले जाणार आहेत. तसेच शैक्षणिक संस्थांनी शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून वक्तृत्व स्पर्धा व चर्चासत्राचे आयोजन करून शिक्षकांचा गौरव करण्यात यावा, अशी सूचनाही परिपत्रकात करण्यात आली आहे.