दलित वस्तीनिधीसह हातपंप खोदकामावर स्थायी समितीत चर्चा

0
17

बेरार टाईम्समधील प्रकाशित वृत्ताला पदाधिकाèयांचा दुजोरा

गोंदिया,दि. ३१-जिल्हा परिषद निवडणुकीनंतरच आज झालेल्या स्थायी समितीच्या पहिल्याच बैठकीत दलित वस्ती निधीच्या बांधकामासह,सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली परिसरात तयार करण्यात आलेल्या हातपंपापासून महिला बालकल्याण विभागाच्या खरेदीवर चांगलीच चर्चा रंगली.सत्ताधारी व विरोधी पक्षात कायद्याचा अभ्यास असणारे सभापती पी.जी.कटरे व विरोधी पक्षात गंगाधर परशुरामकर,राजलक्ष्मी तुरकर या सदस्यामध्येच चर्चा रंगली.सोबतच तालुकास्थळी वैद्यकीय अधिकारी गैरहजर राहत असल्याच्या मुद्यासह बेरार टाईम्स वृत्तपत्रांने प्रकाशित केलेल्या मुद्यावरही विरोधी पक्षाच्या सदस्यांनी चर्चा घडवून आणली.
जि.प.च्या पहिल्या स्थायी समितीच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते गंगाधर परशुरामकर यांनी बेरार टाईम्समध्ये प्रकाशित वृत्ताचा आधार घेत पदाधिकारी बैठकीला आपल्या नातेवार्इंकाना बसवितात असा मुद्दा उपस्थित करताच कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या सभापती छाया दसरे यांनी आपल्या कृषी समितीच्या बैठकीला आपले भाऊ बसल्याची स्पष्ट कबुलीच सभागृहासमोर दिल्याने बेरार टाईम्सने प्रकाशित केलेल्या वृत्तावर शिकामोर्तब झाले.सभापतींनीच मान्य केल्यानंतर प्रकरण तिथेच थांबत सदस्य परशुरामकर यांनी बैठकिच्यावेळी यापुढे दुसरे कुणी बसणार नाही याची काळजी घेण्याची विनंती अध्यक्षांनी केली.लगेच अध्यक्ष उषाताई मेंढे यांनी यापुढे कुठल्याही बैठकिच्यावेळी त्या बैठकीशीसंबधितच उपस्थित राहतील याची काळजी घेण्याचे निर्देश पदाधिकाèयांना दिले.त्याचप्रमाणे बेरार टाईम्सच्या अंकात प्रकाशित वृत्त अध्यक्षांचा भूतबंगला तर पदाधिकाèयांच्या निवासस्थानाला गळती यावर सुध्दा जिल्हा निधीचा खर्च भाड्याच्या निवासस्थानावर आम्ही होऊ देणार नाही.शासकीय निवासस्थान पदाधिकाèयांना उपलब्ध करून देण्याची मागणी केली.त्यावर सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम यांनी अध्यक्षांचा बंगला व पदाधिकारी निवासस्थानाच्या दुरुस्तीकरिता निधी आला असून दुरुस्ती झाल्यानंतर ते शासकीय निवासस्थान पदाधिकारी यांना दिले जाणार असल्याची माहिती दिली.तसेच अध्यक्षा श्रीमती मेंढे यांनी सुध्दा निवासस्थानाची दुरुस्ती झाल्यानंतर आपणासह सर्व पदाधिकारी जाणार असल्याचे आश्वासन सभागृहाला दिले.
जि.प.सदस्य परशुरामकर यांनी सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली परिसरात जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना २६ जून रोजी हातपंपाचे खोदकाम कसे झाले असा प्रश्न उपस्थित करून ७ जुर्ले रोजी या कामांना जिल्हाधिकाèयांनी प्रशासकीय मंजुरी दिल्याचे सांगत याप्रकरणी चौकशीची मागणी केली.त्यावर मुकाअ गावडे यांनीही प्रकरण गांर्भीयाने घेत चौकशीचे आश्वासन सभागृहाला दिले.सोबतच दलित वस्तीच्या कामाचे नियोजन चुकीच्या पद्धतीने झाल्याचे जि.प.सदस्य सुरेश हर्षे यांनी सांगितले.ज्या गावात दलित वस्तीच नाही तिथे काम कसे होणार अशा प्रश्न उपस्थित केला.त्यावर समाजकल्याण सभापती व अधिकारी सदस्यांचे समाधान करू शकले नाही.यासह विविध विषयावर चर्चा सदस्यांनी केली तसेच विरोधी पक्षाचा गटनेता म्हणून आम्हांलाही एक कक्ष देण्यात यावा अशी मागणी परशुरामकर यांनी केली.परंतु अध्यक्ष श्रीमती मेंढे व उपाध्यक्ष श्रीमती गहाणे यांच्याकडून पाहिजे तसे समाधानकारक उत्तर मात्र विरोधी पक्षाच्या सदस्यांना मिळू शकले नाही.या स्थायी समितीच्या सभेला सर्व विभागप्रमुख यांच्यासह तालुकास्तरावरील अधिकाèयांना सुध्दा बोलावण्यात आले होते.