जनता सहकारी बँकेची एटीएम सुविधा

0
7

गोंदिया,दि.२०-गोंदिया, भंडारा व नागपूर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या जनता सहकारी बँकेने सभासद व ग्राहकांसाठी एटीएम सुविधेचा प्रारंभ बँकेचे अध्यक्ष राधेश्याम अग्रवाल यांच्या हस्ते गणेश उत्सवाच्या पावन पर्वावर सुरू केला. यावेळी उपाध्यक्ष ईश्वरदास असाटी, दिनेश दादरीवाल, मोहन अग्रवाल, सुशील अग्रवाल, भगतराम ठकरानी, जगदीश अग्रवाल, रमेशचंद्र जोशी, रविकांत साहू, रमेश जोशी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रारंभ माँ लक्ष्मीच्या प्रतिमेला पूजन करुन करण्यात आले. मुख्य अधिकारी जोशी यांनी बँकेच्यावतीने भविष्यात दिल्या जाणाèया सोयी व एटीएम सुविधेबद्दल माहिती दिली. दादरीवाल यांनी बँकेच्यावतीने देण्यात सोयी सांगूनअन्य बँकाच्यावतीने देण्यात येणाèया सोयी लागू करण्याचे आश्वासन दिले. यावेळी बँकेचे सभासद, ग्राहक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.