राईस मिलर्सशी संबधित आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे गोंदिया उदघाटन

0
15

गोंदिया,दि.१६-येथील राईस मिलर्र्स असोसिएशनच्या वतीने स्थानिक सर्कस मैदानात आंतरराष्ट्रीय तांदूळ व दाळ मशनरी एक्सपोचे आज शुक्रवारला थाटात गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.विशेष म्हणजे गोंदिया शहरातच नव्हे तर जिल्ह्यात पहिल्यांदाच अशाप्रकारच्या राईस मिलर्सशी संबधीत प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.केंद्रात उद्योगमंत्री असतानाही माजी मंत्री प्रफुल पटेल यांना आपल्या कार्यकाळात अशा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात यश आले नव्हते.ते अवघ्या एक वर्षात भारतीय जनता पक्षाला केंद्र व राज्यात सत्ता येताच डबघाईस येऊ लागलेल्या राईस मिलर्स व्यवसायाला नवसंजीवनी देण्याकरिता हा एक चांगला प्रयत्न करण्यात आला आहे.
देशी विदेशी कंपन्याचे जवळपास१०० स्टॉल याठिकाणी लागलेले असून लघू उद्योगासह मोठ्या उद्योगात लागणाèया नव्या तंत्रज्ञानातील मशनरी या एक्स्पोमध्ये ठेवण्यात आल्या आहेत.राईस मिल म्हटले की शेतकèयांचा संबध येतोच परंतु शेतकèयांसाठी पाहिजे तसे या एक्स्पोमध्ये काही दिसून आले नाही.
देशाचा सर्वांगीण विकास साधता यावा शेतकèयांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक पद्धतीने शेती करावी यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियाच्या माध्यमातून विकासाचा मार्ग निवडला. मात्र आता या संकल्पनेचा श्रेय लाटण्यासाठी खासगी कंपन्यांकडून जाळे विणले जात असून महाराष्ट्रात याचा प्रारंभ गोंदिया जिल्ह्यातून होत आहे.
गोंदिया जिल्हा हा धानाचा जिल्हा असून जिल्ह्यात धान उत्पादक शेतकरी अधिक प्रमाणात आहेत. त्यामुळे जिल्ह्याला धानाचा कोठार असे संबोधले जाते. देशाच्या १५ टक्के धान एकट्या गोंदिया व भंडारा जिल्ह्यात पिकत असून या शेतकèयांच्या जिवावर येथील राईस मिल व इतर तांदूळ उद्योग चालतात. दरम्यान आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्या नवनवीन मशनरी विकण्यासाठी त्या मशनरीची जाहिरात करण्यासाठी गोंदिया जिल्ह्याची निवड केली. यासाठी पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यातील राईस मिलर्स असोसिएशनने हा सयुंक्त कार्यक्रम गोंदिया येथे आयोजित करण्यात आला. प्रदर्शनीत भारतीय कंपन्यांसह चीन, जापान, दक्षिण कोरिया, ताईवान, qसगापूर, स्वीट्जरलैंड, जर्मनी, थाईलैंड, या देशातील कंपन्यांनीही सहभाग घेतला आहे.
उद्या १७ ऑक्टोबर रोजी चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याचे अन्न पुरवठामंत्री गिरीष बापट, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकूळे, पालकमंत्री राजकुमार बडोले, खासदार प्रफूल पटेल, खासदार नाना पटोले, आमदार राजेंद्र जैन, संजय पुराम, विजय रहांगडाले, गोपालदास अग्रवाल, आदीं मान्यवर उपस्थित राहणार आहेत.