लेखणीबंद करून मारहाणीचा निषेध

0
17

गोंदिया, दि.: सांगली येथील भूमिअभिलेख विभागाच्या कार्यालयात कर्तव्यावर असलेल्या उपअधीक्षकांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणाचा निषेध म्हणून जिल्ह्यातील भूमिअभिलेख विभागाच्या कर्मचाèयांनी २९ ऑक्टोबर रोजी लेखणीबंद आंदोलन केले.
सांगली येथील भूमिअभिलेख विभागाचे उपअधीक्षक सुशील पवार कार्यालयात कर्तव्यावर होते. दरम्यान, जमिनीच्या व्यवहारात गुंतलेल्या भूमाफियांनी त्यांचे अवैध काम केले नसल्यामुळे पवार यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. या घटनेमुळे राज्यातील विभागाच्या कर्मचाèयांत कमालीचा संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा निषेध आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीकरीता भूमिअभिलेख विभागाच्या कर्मचाèयांनी गुरूवारी एकदिवसीय लेखणीबंद आंदोलन केले. दरम्यान, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.