करंजी ग्रा.प.मध्ये शौचालय बांधकामात भ्रष्टाचार

0
40

आमगाव,दि.  २४- तालुक्यातील ग्रामपंचायत करंजी येथे शौचालय बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचे चौकशीत उघड झाले आहे. यात सरपंच व सचिव यांना दोषी ठरविण्यात आले आहे. या प्रकरणात दोन्ही दोषी असल्याने त्यांच्यावर प्रशासन काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे.विशेष म्हणजे सरपंचाचे पद सुधद्ा यप्रकरणात जाऊ शकते अशी चर्चा आहे.
पंचायत समिती आमगाव अंतर्गत ग्रांमपंचायत करंजी येथे निर्मल भारत अभियान व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (अभिसरण) अंतर्गत एकूण ३५0 लाभार्थ्यांची यादी मंजूर आहे. या व्यतिरिक्त एपीएल अदरचे १0७ लाभार्थी असे एकूण ४५७ शौचालयांचे बांधकाम करावयाचे होते. त्यापैकी ३५0 लाभार्थ्यांना अनुदान देय होते.करंजी येथे प्रत्यक्षात सन २0१३-१४ या वर्षी कामाला सुरूवात करण्यात आली.त्यामध्ये आजपर्यंत एकूण १४३ लाभार्थ्यांचे काम पूर्ण झाल्याचे चौकशीत आढळून आले आहे. त्यामध्ये निर्मल भारत अभियान व मनरेगा अंतर्गत एकूण १२२ लाभार्थ्यांची हजेरी पत्रके काढून कामे करण्यात आलेली आहेत. अभिसरण अंतर्गत कामांना (५१00+४३00) अनुदान देय होते. पंचायत समितीकडून ग्रामपंचायतने मागणी केल्यामुळे २५0 लाभार्थ्यांचे बांधकाम करणे आवश्यक होते. परंतु प्रत्यक्षात १४३ लाभार्थ्यांचे बांधकाम केले व रेकार्ड सन २0१३-१४ ची कॅशबुक दप्तरी आढळून आलेली नाही.
सन २0१४-१५ ची कॅशबुक तसेच बँक पासबुकनुसार १६ लाख १३ हजार १00 रुपये खात्यातून काढण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त मनरेगा अंतर्गत लाभार्थी संख्या १२२, अकुशल खर्च ३ लाख ३३ हजार ७२0 रूपये, कुशल खर्च, गवंडी एक लाख ९४ हजार ७७५ रूपये प्रमाणे एकूण ५ लाख २८ हजार ४९५ रुपयांपैकी अकुशल मजुरी ही हजेरी पत्रकानुसार मजुरांच्या खात्यात ३ लाख ३३ हजार ७२0 रूपये एफएमएसनुसार रक्कम वळती करण्यात आली. 
तसेच एक लाख ९४ हजार ७७५ रूपये गवंडी (मिस्त्री) मजुरी ही ग्रामपंचायत खात्यात वर्ग करण्यात आलेली आहे. एकंदरीत सदर कामाकरिता २१ लाख ४८ हजार ४९५ रुपये वितरित करण्यात आलेले आहे. सदर सर्व बाबींचे अवलोकन केले असता ग्रामपंचायतला एकूण २५0 लाभार्थ्यांकरिता एनबीएन+एसबीएम अंतर्गत १६ लाख २0 हजारांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे. मनरेगा अंतर्गत ५ लाख २८ हजार ४९५ रूपये वितरित झालेले आहे, असे विस्तार अधिकारी पंचायत समितीच्या चौकशीत नमूद करण्यात आले. 
ग्रामपंचायतीने प्रत्यक्षात १४३ शौचालयांचे बांधकाम पूर्ण केल्याचे दिसून येते. तसेच प्रत्यक्ष २६ लाभार्थ्यांना ५ हजार १00 रूपये याप्रमाणे चेकद्वारे एकूण १ लाख ३२ हजार ६00 रूपये वितरित करण्यात आले. तसेच ७ लाभार्थ्यांना १२ हजार रूपयेप्रमाणे एकूण ८४ हजारांचा निधी धनादेशद्वारे वितरित करण्यात आलेला आहे. 
पंचायत समितीच्या चौकशी अहवालात ८ लाख ९२ हजार ५00 रूपये एनबीए तसेच एसबीएम ५ लाख 0४ हजार रूपये असे एकूण १२ लाख ९६ हजार ५00 रुपये तत्कालीन ग्रामसेवक ए.यू. राठोड व सरपंच पंचफुला महेश बागडे यांनी संयुक्तरित्या नियमबाह्यपणे सेल्फ विड्राल करून शासकीय निधीचा दुरूपयोग केला. तसेच झालेल्या खर्चाबाबत कोणतेही प्रमाणके दप्तरी आढळून आलेले नाही आणि झालेल्या खर्चाबाबत मासिक/ग्रामसभांमध्ये मंजुरी न घेता रक्कम परस्पर खात्यातून काढलेली आहे.