पवनीत वर्षभरात ५३१ सापांना जीवदान

0
28

 

पवनी ,दि.31: शहरात मागील चार वर्षापासून कार्यरत मैत्र वन्यजीव सप्ताहात संवर्धन बहुउद्देशिय संस्थेच्या पदाधिकार्‍यांकडून शहरातील विविध भागातून तब्बल ५३१ साप पकडून जंगलात सोडून जीवनदान दिले आहे. साप, घोरपड, निलगाय या जंगली प्राण्यांसोबतच पिंगळ व शिक्रा पक्ष्यांचाही यात समावेश आहे.
 १ जानेवारी २0१५ ते ३१ डिसेंबर २0१५ या वर्षभराच्या कालावधीत विषारी व बिनविषारी ५३१ सापांना व घोरपड ६, निलगाय २, पिंपळ पक्षी १, शिक्रा पक्षी १ यांना जीवनदान देण्यात मैत्रच्या पदाधिकार्‍यांना यश आले आहे.
मैत्र वन्यजीव संरक्षण व संवर्धन बहुउद्देशिय संस्था पवनीचे पदाधिकारी सर्पमित्र खेमराज पचारे, महादेव शिवरकर, माधव वैद्य, महेश मठीया, अमोल वाघधरे, संघरत्न धारगावे यांनी अनेक जहाल विषारी, बिनविषारी व दुर्मिळ सापांना पकडले आहे. पवनी पंचक्रोशीत कुठेही साप निघाल्यास मैत्रच्या पदाधिकार्‍यांना पाचारण केल्या जाते. मैत्रचे पदाधिकारी कुठेही असले तरी तत्परतेने घटनास्थळावर दाखल होतात. 
जीवाची पर्वा न करता अत्यंत शिताफीने व चिकाटीने सापाला ताब्यात घेतात. त्यांनी वर्षभरात अने साप पकडले आहेत. यात २0९ विषारी सापाचा समावेश असून त्यात नागर १५३, मण्यार २९, घोणस ३३ तर १ सौम्य विषारी साप ,तर बिनविषारी ३२१ सापांना जीवनदान दिले आहे. धामण १११, धुळनागीन ९, कवळ्या ३८, घोणस ४६, कुकरी १२, पाणदिवट ४९, रुका ११, वाळा ३, चंचू वाळ २, नानोटी ८, शेवाळी पाणदिवट १, पट्टेरी कवळ्या १, अजगर १ यांचा समावेश आहे. 
तसेच अन्य प्राण्यांमध्ये निलगाय २, घोरपड ६, पिंपळ पक्षी १, शिक्रा यांनाही मैत्रच्या पदाधिकार्‍यांनी जीवनदान देऊन निसर्गाचा समतोल राखण्यास मोलाचे सहकार्य करीत आहेत.