T-20 मध्ये टीम इंडिया नंबर वन

0
12
वृत्तसंस्था
सिडनी – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम टी-20 लढतीत भारताने ऑस्‍ट्रेलियाचा 7 गडी राखून पराभव केला आहे. क्रिकेटच्‍या 140 वर्षांच्‍या इतिहासात ऑस्ट्रेलियाला पहिल्‍यांदाच आपल्‍याच मैदानात क्रिकेट मालिकेच्‍या सर्व सामन्यांमध्‍ये पराभव स्‍वीकारावा लागला. भारताने टी-20 मालिकेत 3-0 असा विजय मिळवला आहे.

ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियातच व्हाईट वॉश देण्याचा पराक्रम आज भारताने केला. आताच आयसीसीने जाहीर केलेल्या T-20 संघाच्या रँकीगमध्ये भारताने प्रथम क्रमांकावर गरुडझेफ घेतली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिका सुरु होण्यापुर्वी भारत T-20 रँकीकमध्ये कसोटी खेळणाऱ्या देशात सर्वात शेवटच्या ८ व्या स्थानी होता. भारताने ऑस्ट्रेलियाला व्हाइट वॉश दिल्यामुळे रेटींग गुणात भारताने नंबर एकवर असलेल्या वेस्ट इंडीजला पच्छाडले आणि क्रमांक एकचे स्थान काबिज केले.
९ फेब्रुवारीपासून मायदेशात श्रीलंकेविरुद्ध ३ T20 सामन्याची मालिका भारत खेळणार आहे. श्रीलंकेविरुद्ध भारताने विजयी अभीयान कायम राखले तर भारताचे शिर्ष स्थान कायम राहिल . १२० गुणासह भारत प्रथम, ११८ वेस्ट इंडीज, ११८ श्रीलंका.
सध्या भारत कसोटी मध्ये प्रथम क्रमांकावर आहे. तर एकदिवसीय संघात दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. भारतीय संघ टी-20 सामन्यात शानदार प्रदर्शन करत फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही प्रकारांत ऑस्ट्रेलियावर वरचढ ठरला. संघातील अनुभवी खेळाडू सुरेश रैना, युवराज सिंग, आशिष नेहराने पुनरागमन केले आहे. युवा खेळाडू हार्दिक पांड्या व जसप्रीत बुमराह यांनी चमकदार कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधले.