देवरी येथे शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

0
18

 

झामसिंग येरणे यांनी पत्रपरिषदेत दिली माहिती

देवरी- स्थानिक कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्थेद्वारा संचालित शिवाजी शिक्षण संकुल परिसरात शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण येत्या रविवारी (ता.21) रोजी करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव झामसिंग येरणे यांनी आज (ता.15) आयोजित पत्रपरिषदेत दिली.

कृष्ण सहयोगी शिक्षण संस्थेच्या वतीने शिवाजी शिक्षण संकुलात शिवाजी महाराजांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण रविवारी करण्यात येणार आहे. या सोहळ्याला अध्यक्ष म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री व सामाजिक न्याय मंत्री ना. राजकुमार बडोले, उद्घाटक म्हणू राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार, प.पू. सदगुरुदास महाराज, शालेय शिक्षणमंत्री ना. विनोद तावडे, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई, आदिवासी विकासमंत्री ना. विष्णू सावरा, स्वागताध्यक्ष म्हणून आमदार संजय पुराम, हे उपस्थित राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून खा. नाना पटोले, खा. अशोक नेते, खा. रामदास तडस, आम. ना गो गाणार,आ. अनिल सोले, आ. विजय रहांगडाले, आ. राजेस काशिवार,  आ. चरण वाघमारे, आ. रामचंद्र अवसरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी आमदार रमेश कुथे, देवरीच्या सभापती देवकी मरई, नगराध्यक्ष सुमन बिसने आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

शिवाजी महाराज जयंती दिनी शिवाजी संकुलातून महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या शोभायात्रेचे आय़ोजन करण्यात आले आहे. याच दिवशी प्रा. शिवाजी पाठक लिखित झाडीबोलीचा दिदार या पुस्तकाचे विमोचन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला झाडीबोली साहित्य संमेलनाचे केंद्रीय सचिव राम महाजन आणि विशेष अतिथी म्हणून हेमकृष्ण कापगते उपस्थित राहणार आहेत.दुपारी दीड वाजता रक्तदान शिबिराचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱे प्रवचनाच्या कार्यक्रमाचे आय़ोजन सुद्धा यावेळी करण्यात आले आहे.

या कार्यक्रमांना विद्यार्थी, पालक, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे सचिव श्री येरणे यांनी केले. पत्रपरिषदेला सहसचिव अनिल येरणे, प्रा. जयश्री भुरे, प्रा. उपदेश लाडे आणि प्रा. मनोज भुरे आदी उपस्थित होते.