विदर्भात अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान

0
13

गोंदिया,दि.२९: आज सकाळपासूनच जिल्हयाच्या  सर्वच भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. यामुळे रब्बी पिकाचे नुकसान झाले.सोबतच विदर्भातील सर्वच जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.नागपूर जिल्ह्यात तर संत्र्याचे मोठे नुकसान झाले आहे.गोंदिया जिल्ह्यात गव्ह्ाचे आणि रब्बी पिकाचे नुकसान झाले आहे.काही तालुक्यात विज पुरवठा सुधद्ा खंडीत झालेला होता.गोंदिया शहरातही आज विजेचा लपंडाव राहिला.तर दुरध्वनी सेवेवरही प्रभाव जाणवला. त्याचप्रमाणे गडचिरोलीत सुमारे अर्धा तास पावसाच्या सरी कोसळल्या. आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा व धानोऱ्यातही तुरळक पावसाने हजेरी लावली. सुमारे चार तास गडचिरोलीचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास कुरखेडयात वादळी पावसास सुरुवात झाली. यावेळी शहरातील बत्ती गुल झाली होती. गडचिरोलीतही मेघगर्जेनेसह पावसाचे आगमन झाले.नागपूर जिल्ह्यातील काटोल भागात आलेल्या वादळी वारा व पावसामुळे मिरची,संत्रा,गहू पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.अमरावती जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी पालकमंत्री प्रविण पोटे यांनी आज करुन प्रशासनाला नुकसानभरपाईचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले.हिंगणा तालुक्यात आज गारपीट पडल्याने पिकाचे नुकसान झाले आहे.