आरक्षण, रोजगार, घरकुलांची मागणी : संघर्ष वाहिन्यांचा आठही तालुक्यांत मोर्चा

0
31

गोंदिया,दि.२९ : भटक्या विमुक्त जातींना न्याय हक्क मिळवून देण्याकरिता संघर्ष वाहिनी गेल्या कित्येक वर्षांपासून कार्य करत आहे.मात्र, त्यांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. आरक्षण, रोजगार, घरकुल आदी बाबतीत समाजाची उपेक्षा सुरूच आहे. शासनाला जागे करण्याच्या दृष्टीने संघर्ष वाहिनीच्या वतीने जिल्ह्यातील आठही तालुका कचेèयांवर सोमवारी मोर्चा धडकला. यावेळी सर्व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
नागपूर येथील संघर्ष वाहिनी ही सामाजिक संघटना विमुक्त भटक्या जमातीच्या हक्कांकरिता लढा देत आहे. भटक्यांच्या जीवनाला दिशा मिळावी, याकरिता अनेकदा मोर्चे काढण्यात आले. शासनाने यापूर्वी अनेक आश्वासने दिली; परंतु, त्यांची पूर्तता झाली नाही. मागण्यांची पूर्तता करण्यासंबंधी शासनाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विमुक्त भटक्या समाजाच्या प्रतिनिधींना ११ टक्के स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, १९६९ मध्ये गठीत करण्यात आलेल्या शशिकांत दैठणकर यांनी सुचविलेल्या शिफारसीनुसार लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थसंकल्पात विशेष आर्थिक तरतूद करण्यात यावी, तलाव, बोड्या आणि बांध उच्च जातीतील श्रीमंत लोक पैशांच्या बळावर मच्छीमार संस्थांकडून बळकावून घेत आहेत. त्यामुळे गरीब मच्छीमार लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मच्छीमार बांधवांनाच मत्स्यव्यवसायाचे कंत्राट देण्यात यावे. २००८-०९ पासून अनुसूचित जातीसाठी रमाई आंबेडकर घरकुल योजना सुरू झाल्यापासून नऊ लाख लोकांनी घरासाठी अर्ज केले. त्याकरिता सहा वर्षांत तीन हजार कोटींची तरतूद दोन लाकांपेक्षा जास्त घरे बांधून देण्यात आली. मात्र, भटक्या विमुक्त जमातीतील कुटुंब गेल्या ५० वर्षांपासून उघड्यावर संसार रेटत आहेत. त्यांना रमाई घरकुल योजनेच्या धर्तीवर घरकुल योजना लागू करून वर्षाकाठी पाचशे कोटींची तरतूद करण्यात यावी. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार वंशपरंपरागत व्यवसाय करणाèया जमातींना क्रिमेलिअरची अट लागू करू नये, असे स्पष्ट निर्देश असताना राज्य सरकारने भटक्या जमातींना क्रिमेलिअरची अट लावली आहे, ती रद्द करण्यात यावी. वनहक्क कायद्यांतर्गत तलावातील मासेमारीचे हक्क भटक्या विमुुक्तांना द्यावे, झुडपी जंगलाच्या जमिनीवर वसलेल्या भटक्यांच्या वस्त्यांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे, विमुक्त भटक्यांचे गायरान चराईचे हक्क सुरक्षित करण्यात यावे, विमुक्त भटक्यांनी वाहत असलेल्या अतिक्रमित जमिनीचे नियमितीकरण व मालकी हक्क द्यावे, अशी मागणी करण्यात यावी, आदी मागण्यांचा समावेश होता.
देवरी येथील मोर्चात भोई समाज संघाचे प्रफुल्ल पाटील, तुलाराम कुराडे, भगवानदास ठाकरे, भोजराज कांबळे, दिनेश वलथरे, आनंदराव कांबळे, प्रकाश वाघमारे, लखन नान्हे, मुुकुंद अड्डेवार, के.टी. कांबळे, गणराज नान्हे, दसाराम शेंडे, घनश्याम कुराडे, विनायक करमकार, सुरेश भोंगाडे, किशन ठाकरे, हरी ठाकरे, छगन कोसरे आदींचा समावेश होता.

गोरेगाव : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समता व सामाजिक न्यायासाठी तहसील कार्यालयावर विविध मागण्यासाठी विमुक्त भटक्या जमातीमध्ये येत असलेल्या समाजबांधवांनी मोर्चा काढून मागण्याचे निवेदन तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांना दिले.मोर्चा नेतृत्व सावतराव मारबदे, रोमनलाल मोहनकर, अरुण मेश्राम सतीश नागपुरे, विकास चाचेरे, बाबुलाल मेश्राम, रमेश मेश्राम, अनंतराज बागळे, कल्याणी नान्हे, ममता सोनवाने, पोरस शेंडे, कल्पना मेश्राम, शंकर गायकवाड, तिमाजी चाचेरे, अशोक मेश्राम, कोमेश कांबळे, केशरबाई कुमले, घनश्याम गायकवाड व समाजबांधव सहभागी झाले होते.