सहा एप्रिलला भाजपचा स्थापना दिवस

0
21

गोंदिया,दि.31-गोंदिया शहर भारतीय जनता पक्षाच्यावतीने येत्या 6 एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस साजरा करण्यात येणार आहे.यानिमित्ताने  भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन जिल्हा सामान्य रुग्णालय केटीएस गोंदिया येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरात जनतेने मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शहर अध्यक्ष सुनिल केलनका यांनी केले आहे.