कडू यांच्या समर्थनात चक्काजाम आंदोलन

0
23
विशेष प्रतिनिधी
अमरावती,दि.31-जिल्ह्यातील अपक्ष आमदार व प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडु यांच्या अटक प्रकरणाला घेऊन अमरावती जिल्ह्यात चांगलेच वातावरण पेटले आहे. अमरावतीच्या अनेक तालुक्यात बच्चू कडूंच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी रस्ता रोको आंदोलन केले. चांदुर बा

जार ,अचलपुर ,परतवाडयात चक्का जाम आंदोलन कडु कार्यकर्त्यांनी केले. कडू यांच्या सूटकेच्या मागणी करिता हे आंदोलने केल्या जात आहेत. या आंदोलनांत अपंग आदिवासी संघटनेच देखील समावेश आहे.
आंदोलनात सहभागी असलेल्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आमदार बच्चू कडू यांना मंत्रालायातील उपसचिव भाऊराव गावित यांना मारहाण केल्याप्रकरणी बुधवारी रात्री अटक केली. विधानसभेतील कामकाज संपल्यावर कडू स्वतः मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गेले.  त्यांच्यावर लावले गेलेले आरोप  खोटे आहेत असे त्यांनी सांगितले. पोलीस ठाण्याच्या आवारात कडू यांचे समर्थक उपस्थित होते. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तिथे  मोठा बंदोबस्त करण्यात आला होता.
परिमंडळाचे  उपायुक़्त मनोजकुमार शर्मा यांनी व्यवस्थित पणे पाहणी केली. कडू न्यायालयात गुरुवारी हजर होतील. अधिकाऱ्याला मारहाण केल्यामुळे अधिकारी कर्मचारी संघटनेने सोमवारपर्यंत आंदोलन स्थगित केले आहे. मात्र कडू यांच्यावर मारहाणीबरोबरच ‘अट्रोसिटी अक्ट’ लावावा, अशी अधिकार संघटनेची मागणी आहे.
kaduकडू मंगळवारी दुपारी सामान्य प्रशासन विभागातील उपसचिव गावित यांच्या कक्षेत गेले व तिथे जाऊन त्यांच्यावर   हात उगारला असा  आरोप लावण्यात आला आहे. घटनेनंतर  कर्मचाऱ्यांनी आंदोलन करीत मारहाणीचा निषेध केला. मंगळवारी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात कडू यांच्यावर  गुन्हा दाखल झाला होता. कर्मचारी संघटना कडू यांच्या अटकेसाठी आग्रही असल्याने त्यांना अटककरण्याचा निर्णय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानी  घेतला. त्यानुसार कारवाईसाठी  विधान भवनाच्या परिसरात दुपारपासून अतिरिक़्त पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता.”अट्रोसिटी लावा नाहीतर काम बंद” असे अधिकारी कर्मचाऱ्याने ठाम पणे सांगितले आहे.