नागपूर जिल्ह्यातील 307 शेतकऱ्यांचे 74 लाख 68 हजार 788 रुपयांचे सावकारी कर्ज माफ

0
54

नागपूर : जिल्ह्यातील मौदा, भिवापूर, रामटेक, सावनेर, उमरेड, पारशिवनी, काटोल, कुही, नरखेड या दहा तालुक्यातील शेतकऱ्यांनी तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी परवानाधारक सावकांराकडून घेतलेल्या कर्जास शासन निर्णयानुसार 307 शेतकऱ्यांच्या 74 लाख 68 हजार 788 रकमेला कर्ज माफी देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी जिल्हास्तरीय समितीच्या बाराव्या बैठकीत दिली. 

जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अनंत रोकडे, जिल्हा उपनिबंधक सतीश भोसले, जिल्हा विशेष लेखापरिक्षक प्रतिनिधी एम.एस. आटे, सावकारी विभागाचे सहाय्यक निबंधक टी.एन.चव्हाण आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेल्या कर्जाच्या संदर्भात तालुकानिहाय प्रकरणी अशी मौदा तालुका एक सावकार, शेतकरी संख्या 1, कर्जमाफी 9 हजार 541, भिवापूर तालुका 3 सावकार, शेतकरी संख्या 35, कर्जमाफी 13 लाख 39 हजार 234, रामटेक तालुका 1 सावकार, शेतकरी संख्या 3, कर्जमाफी 67 हजार 23, सावनेर तालुका 14 सावकार, 151 शेतकरी, 24 लाख 33 हजार 870, उमरेड तालुका 22 सावकार, शेतकरी संख्या 68, कर्जमाफी 17 लाख 79 हजार 659, पारशिवनी तालुका 3 सावकार, शेतकरी संख्या 9, कर्जमाफी 5 लाख 42 हजार 414, काटोल तालुका 14 सावकार, शेतकरी संख्या 56, कर्जमाफी 8 लाख 23 हजार, कुही तालुका 4 सावकार, शेतकरी संख्या 19, कर्जमाफी 4 लाख 58 हजार 721, नरखेड तालुका 1 सावकार, शेतकरी संख्या 1, कर्जमाफी 15 हजार 262. अशा एकूण 63 सावकरांकडून 307 शेतकऱ्यांनी घेतलेल्या 74 लाख 68 हजार 788 रकमेला कर्जमाफी देण्यात आली आहे.