स्वच्छतेसह ग्राम विकासाचा संकल्प करा- सुधीर मुनगंटीवार

0
20

चंद्रपूर : स्वच्छतेचा थेट संबंध आरोग्याशी असून जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत व गाव हागणदारीमुक्त व निर्मल करण्याबरोबरच विकसित करण्याचा संकल्प करा, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित स्वच्छता उत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरुनुले, वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, शिक्षण सभापती देवराव भोंगळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मोहिते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीराम गोगुलवार, शिक्षणाधिकारी डोर्लीकर, जि.प. सदस्य ब्रिजभूषण पाझरे, बंडू माकोडे आदी उपस्थित होते.

प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित स्वच्छता उत्सवाचे श्री.मुनगंटीवार यांनी दीप प्रज्वलन करून उद्घाटन केले. चंद्रपूर जिल्हा विकासाच्या मार्गावर नेण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, या निमित्ताने जिल्ह्यातील 15 तालुके स्वच्छ व हागणदारीमुक्त करण्याचा विडा उचलूया. ही मोहीम केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्षात उतरली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या ग्राम उदय से भारत उदय या मोहिमेतही आपला जिल्हा अव्वल यायला हवा असे आवाहन त्यांनी केले.

यशवंत पंचायत राजमधे राज्यात प्रथम आलेली पंचायत समिती ब्रम्हपूरी, ब्रम्हपूरी तालुक्यातील निलज ग्रामपंचायत, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात तिसरा क्रमांक मिळवणारी मुल तालुक्यातील भवराळा ग्रामपंचायत, पंचायत सशक्तीकरण अभियान पुरस्कारामध्ये बल्लारपूर तालुक्यातील लावारी ग्रामपंचायत, ब्रम्हपूरी तालुक्यातील भूज ग्रामपंचायत, विदर्भात सर्वप्रथम हागणदारीमुक्त झालेली बल्लारपूर पंचायत समिती, राज्यात सर्वप्रथम हिरकणी कक्ष स्थापन करणाऱ्या वरोरा तालुक्यातील टेभूर्डा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.भट्टाचार्य यांना श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात डॉ.कल्याणकर यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची चित्रसंग्रहासह एक पाऊल विकासाची या नावाची पुस्तिका प्रकाशित करण्यात आली.

कार्यक्रमाला जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ कृष्णकांत खानझोडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय धोटे, प्रकाश उमक, बंडू हिरवे, साजीद निझामी, अंजली डाहुले, माधवी मते, तृषांत शेंडे, प्रवीण खंडारे आदी उपस्थित होते.