दुष्काळी स्थितीची पाहणी १ जून रोजी केंद्रीय पथक जिल्ह्यात

0
16

गोंदिया,दि.३१ : राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्याच्या दौऱ्यावर असून आज १ जून रोजी केंद्राचे पथक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची ते पाहणी करणार आहेत. हे पथक गोरेगाव तालुक्यातील सोनी व बोटे आणि आमगाव तालुक्यातील पदमपूर व बाम्हणी या गावांना भेटी देवून परिस्थितीची पाहणी करणार असून ग्रामस्थांशी संवाद साधणार आहे. या पथकामध्ये निती आयोगाचे वरिष्ठ संशोधन अधिकारी (कृषि) डॉ.रामानंद, ग्रामीण विकास मंत्रालयाचे अवर सचिव रामा वर्मा, केंद्रीय वीज प्राधिकरणाचे संचालक जे.के.राठोड, नागपूर येथील सीडब्ल्यूसीचे उपसंचालक मिलींद पनपाटील आणि मुंबई येथील केंद्रीय अन्न महामंडळाचे सहायक महाव्यवस्थापक एम.एम.बोऱ्हाडे यांचा समावेश आहे.