३ वर्षात संपूर्ण राज्य हागणदारीमुक्त करणार -लोणीकर

0
17

पंढरपूर, दि. ३० – समृध्दीचा मार्ग स्वच्छतेच्या वाटेवरुन जातो. महात्मा गांधी, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांनी स्वच्छतेचा संदेश यापूर्वीच दिला आहे. त्यांची ही शिकवण पूढे नेण्याचा केंद्र व राज्य शासनाचा प्रयत्न आहे. राज्यातील ५ हजार ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या असून ३ वर्षात संपूर्ण राज्य हागणदारीमुक्त करण्याचा मानस आहे, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले. स्वच्छतेच्या संदेशाच्या वारक-यांनी साºया देशभर प्रसार करावा, असे आवाहन त्यांनी केले.पंढरपूर वारी मार्गावरील गावांचा राष्ट्रीय पेयजल योजनेत समावेश करुन सर्व गावांच्या पाणी पुरविण्यासाठी एकत्रित योजना करण्याचा विचार असून जिल्हा परषिदेने त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव सादर करावा, असे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले.
पंढरपूर नगरपारिषदेच्या वतीने आयोजित शहर स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास पालकमंत्री विजय देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्षा जयमाला गायकवाड, आमदार प्रशांत परिचारक, नगराध्यक्षा साधना भोसले उपस्थित होत्या.