पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात

0
20

पेट्रोल दरात प्रति लिटर १ रुपया ४२ पैसे, तर डिझेलच्या दरात प्रति लिटर २ रुपये १० पैशांनी कपात
नवे दर आज मध्यरात्रीनंतर लागू होणार आहेत.

नवी दिल्ली – पेट्रोल दरात प्रति लिटर १ रुपया ४२ पैसे, तर डिझेलच्या दरात प्रति लिटर २ रुपये १० पैशांनी कपात
देशभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये रविवारी कपात करण्यात आली. त्यामुळे आता पेट्रोल प्रतिलीटरमागे १ रुपया ४२ पैसे आणि डिझेल प्रतिलीटरमागे २ रुपये १० पैशांनी स्वस्त होणार आहे. हे नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या किमती घसरल्याच्या परिणामी तेल कंपन्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे सामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. या दरकपातीनंतर नवी दिल्लीत आता पेट्रोलचे दर ६१.०९ आणि डिझेलचे दर ५२.२७ इतका असेल. दर महिन्याच्या १ आणि १५ तारखेला सरकारकडून आंतरराष्ट्रीय स्तरावरील कच्च्या तेलाच्या दरांचा आढावा घेतला जातो. त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची नव्याने रचना करण्यात येते. या महिन्यात तिसऱ्यांदा इंधन दरात कपात झाली असून यापूर्वी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे १६ जुलै रोजी २.२५ रूपयांनी तर डिझेल प्रति लिटरमागे ०.४२ पैशांनी स्वस्त झाले होते.