धाबेटेकडीला राज्यस्तरीय वनग्राम पुरस्कार

0
22

गोंदिया- जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुकतील धाबेटेकडी गावाला संत तुकाराम वनग्राम योजने अंर्तगत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपुरात राज्यस्तरीय तृतीय पुरस्कार देण्यात आला. धाबेटेकडी गावाच्या वन व्यवस्थापन समितीने अर्जुनी मोरगाव वन क्षेत्राचे सहायक वनरक्षक राहुल पाटील यांच्या सहकार्याने सहवनक्षेत्र धाबेटेकडी येथील राखीव वन कक्ष क्रमाक २६८ मधील ४०३.०७ हेक्टर जागेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच सहवनक्षेत्र परिसर व गावात वनीकरण, मृद व जलसंपादण, वनसंरक्षण, वन वणवा प्रतिबंधक उपाय, वनक्षेत्रावरील अतिक्रमास प्रतिबंध, अवैध चराईस प्रतिबंध, वन्य पशू पक्षी संरक्षण, पाणवठे, श्रमदान, महिला-पुरूषांचा सहभाग, नवेत्तर पर्यायी इंधनाचा वापर, अभिलेख,नवसंकल्पना व जनजागृती इत्यादी कार्यांची काटेकोरपने अंमलबजावणी करत जंगलांचे संरक्षण केले. म्हणून याच बाबीची दखल घेत वन विभागाने धाबेटेकडी गावाला संत तुकाराम वनग्राम योजने अंतर्गत तृतीय पुरस्कार दिला असून दीड लाख रूपये रोख, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह असा पुरस्काराचे स्वरूप असून सन २०१४-१५ या वर्षातील वनग्रामचा पुरस्कार पटकाविणारे धाबेटेकडी हे जिल्ह्यातील एकमेव गाव आहे.