भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानात गोंधळ

0
18
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, दि. २९ – भारताच्या स्पेशल फोर्सेसच्या कमांडोंनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर पाकिस्तानी लष्कर आणि सरकारने परस्परविरोधी दावे केले आहेत. भारतीय कमांडोंनी या कारवाईत अनेक दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. भारतीय लष्कराच्या डीजीएमओनी या कारवाईची माहिती जाहीर केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी लगेच या कारवाईचा निषेध केला. आमची शांततेची इच्छा आहे पण त्याला आमची दुर्बलता समजू नये अशी प्रतिक्रिया शरीफ यांनी दिली. पण पाकिस्तानी लष्कराने असा कोणताही हल्ला झाला नसल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तानी लष्कराचे मुखपत्र असलेल्या आयएसपीआरने हल्ला झाला नसल्याचे म्हटले आहे. भारताने कुठलेही सर्जिकल स्ट्राईक्स केले नाहीत. फक्त भारताने सीमेपलीकडून गोळीबार केला. भारत जाणीवपूर्वक हल्ल्याचा दावा करुन खोटी माहिती पसरवत आहे असे पाकिस्तानी लष्कराने म्हटले आहे.