दुर्गा, शारदा उत्सव मंडळानी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे- सुरेश कदम

0
26

berartimes.com गोरेगाव,दि.२९:- सार्वजनीक दुर्गा उत्सव व शारदा उत्सव धार्मिक रितीने दरवर्षी साजरा केल्या जातो. पण हा उत्सव साजरा करतांना अनेक दुर्घटना किवा हाणामारीची तक्रार पोलीस स्टेशनला येते, यामुळे स्थापनेपासुन विसर्जनापर्यत नियमांचे काटेकोरपणे सर्व मंडळांनी करावे असे आवाहन गोरेगावचे पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी बचत भवन येथे आयोजीत सभेत उत्सव मंडळांच्या पदाधिका-यांना केले. यावेळी नायब तहसीलदार एन एम वेदी, विज वितरण कंपणीचे येळे, पोलीस पाटील, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष , मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावर्षी सार्वजनीक शारदा ३६ व दुर्गा ४८, घरघुती दुर्गा उत्सव साजरा करण्यासाठी अर्ज आलेले आहेत. या सर्व मंंडळाच्या सदस्यांनी उत्सव साजरा करण्यासाठी स्वयसेवक ठेवावे, विज तारावर हुक टाकुन विज घेवु नये, पोलीस पाटलांनी दरदिवसी कार्यक्रम स्थळी भेटी देवुन होणा-या कार्यक्रमाची माहीती पोलीस स्टेशनला द्यावी, देखाव्यापासुन समाज भावना दुखवु नये,सहामाई परिक्षा सुरु होणार असल्याने स्पिकरचा आवाज मोठा करु नये, महाप्रसादपासुन विषबाधा होवु नये याची दक्षता घ्यावी, दुर्दैवाने अपघात झाल्यास विज वितरण कंपणी, पोलीस स्टेशन, रुग्नालय यांचे मोबाईल क्रमांक ठेवुन व्हिजीट बुक ठेवावे, क्रास गुन्हा, दरोडेखोर गुन्हा झाल्यास मंडळाला जवाबदार धरण्यात येईल विसर्जन स्थळी अनुचित घटना घडु देवु नये लहान मुला, मुलींना ट्रक्टर ट्रालीवर बसवु नये चालकाचा परवाना असने आवश्यक , शक्यतो इंशुरन्स असावा सात व्यक्तीचा मंडळ तयार करुन त्याचेआधारकार्ड, पँन कार्ड ची झेराक्स अर्जासोबत जोडावे अशी माहीती पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी उपस्थिना दिली