प्रलबिंत मागण्यांना घेऊन मुलचेरावासियांना केला रास्ता रोको आंदोलन

0
15

berartimes.com

गडचिरोली,दि.२९: रस्ते, सिंचन, आरोग्य व अन्य प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज शेकडो नागरिकांनी पहाटेपासून मुलचेरा येथे रास्ता रोको आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधले.मुलचेरा-आलापल्ली मार्ग, मार्कंडा मार्ग, घोट रस्ता व अन्य रस्ते खराब झाले असून, त्यांची तत्काळ दुरुस्ती करावी, चेन्ना प्रकल्पाचे काम तातडीने सुरु करुन मुखडी, गोमणी, आंबटपल्ली व गोविंदपूर ग्रामपंचायतींतगत १२ गावांचे सर्वेक्षण करुन सिंचनाची सोय उपलब्ध करुन द्यावी, टिकेपल्ली उपसा सिंचन योजनांचे काम हाती घ्यावे, ग्रामीण रुग्णालय व सुंदरनगरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरावी इत्यादी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. पहाटे पाच वाजतापासून आंदोलन सुरु झाल्याने सुमारे तीन ते चार तास वाहतूक खोळंबली होती.

सामाजिक कार्यकर्ते अब्दूल जमीर हकीम, नगराध्यक्ष सुभाष आत्राम, पंचायत समिती सभापती नामदेव कुसनाके, नगर पंचायतीच्या महिला व बालकल्याण सभापती जास्वंदा गोंगले, पाणीपुरवठा सभापती अल्का मेहर, सुंदरनगरच्या सरपंच चंपा स्वर्णकार, शिवसेना तालुकाप्रमुख नीलकमल मंडल, शहरप्रमुख दीपक बिस्वास, राजू सोनटक्के, वासुदेव मडावी, बालाजी सिडाम, अमित मुजुमदार, वासू मुजुमदार, गजानन आलाम, सुधार सरकार, चित्तरंजन रॉय बबतोष मिर्धा, गोपाल बिस्वास, गोविंद बिस्वास, मनोरंजन जयधर, दिवाकर उराडे, सत्यवान शेडमाके, सुरेश दायले, भगवान पेंदाम यांच्यासह अन्य नागरिक सहभागी झाले होते.