एसटीची सहा प्रादेशिक कार्यालयं दिवाळीनंतर बंद

0
15

गोंदिया,दि.29- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती ही सहा प्रादेशिक कार्यालयं दिवाळीनंतर बंद होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या सूत्रांनी दिली.साधारण नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. ही कार्यालयं बंद होणार असल्याने एसटीची दोन कोटींपेक्षा अधिक बचत होणार आहे.

6 प्रादेशिक व्यवस्थापक, 6 प्रादेशिक अभियांत्रिकी, 6 सांख्यिकी अधिकारी, 6 सुरक्षा आणि दक्षता अधिकारी, या अधिकारी वर्गासाठी असलेली 12 वाहने, यावर होणारा खर्च टळणार आहे .या सहा प्रादेशिक कार्यालयातील प्रादेशिक व्यवस्थापकांना त्यांच्या मूळ पदावर अथवा मध्यवर्ती कार्यालयात अन्य पदावर सामावून घेण्यात येईल. त्याचप्रमाणे या कार्यालयातील इतर कर्मचारी महामंडळाच्या विविध ठिकाणी असलेल्या डेपोस्तरीय ठिकाणी सामावून घेण्यात येतील.ही सहा प्रादेशिक कार्यालये बंद झाल्यानंतर एसटीच्या विभागीय कार्यालयाचा आता थेट मध्यवर्ती कार्यालयाशी संपर्क होणार आहे, त्यामुळे प्रशासन अधिक गतिमान होण्यास मदत होईल.