पेंशन,घरकुल,शिष्यवृत्तीसाठी ओबीसीनी महामोच्र्यात सहभागी व्हावे

0
13

गोरेगाव,दि.३० – तालुक्यातील ग्रामीण भागात ओबीसी समाजामध्ये जनजागृतीसाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. मुडीपार येथील बाजार चौकात आयोजित सभेला बबलू कटरे, जीवन लंजे, मनोज मेढे, संज़ीव रहांगडाले यांनी मार्गदर्शन केले. ही यात्रा कमरगाव मार्गाने मोहाडी,चोपा, तेढा,गिधाडी, सोनी दवडीपार येथे पोहोचली. सोनी येथे बबलू कटरे व प्रा. संजीव रहांगडाले यानी मार्गदर्शन केले. दवडीपार येथील सभेला ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राजकीय समन्वय डॉ. खुशाल बोपचे, कैलास भेलावे यानी मार्गदर्शन केले. ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी राजकीय पक्ष भेद विसरुन संविधानिक अधिकार प्राप्त करुन घेण्यासाठी सर्व नागरिकांनी ८ डिसेंबरच्या ओबीसी महामोच्र्यात हजारोच्या संख्येंने सहभागी होऊन केंद्र व राज्यातील सरकारला आपली शक्ती दाखविण्याची गरज असल्याचे विचार डॉ. बोपचे यानी व्यक्त केले. तर बबलू कटरे यांनी शेतकèयाना पेंशन व विद्याथ्ङ्र्मांना शिष्यवृत्ती मिळावी, घरकूल योजनेचा लाभ मिळावा यासाठी या मोच्ङ्र्मात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. यावेळी शिशीर कटरे, प्रा. संज़ीव रहांगडाले, सावन डोये, प्रेमलाल साठवने,दिलीप चव्हाण, ससेंद्र भगत, शहर अध्ङ्मक्ष गुड्डू कटरे, प्रा,खुशाल कटरे, बी.डब्ल्ङ्मू.कटरे, चोकलाल येडे आदी उपस्थित होते. सभेला हि.द.कटरे, चैतराम कटरे, मालिकराम कटरे, पुनेश्वर राऊत, प्रकाश कोल्हाटकर, राधेशयाम सोनवाने, टोलिराम बिसेन, दीपचंद कटरे, योगराज कटरे आqदनी सहकार्य केले. संचालन खेमेद्र कटरे व आभार डॉ. साहेबलाल कटरे यांनी मानले.गोरेगाव येथील पी.डी.रहागंडाले विद्यालयाच्या विद्याथ्र्यांना संघटनेचे अध्यक्ष बबलू कटरे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी प्राचार्य कावळे,प्रा.ज्योतिक ढाले,प्राचार्य साहेबलाल भैरम,प्रा.संजिव रहागंडाले,प्रा.छत्रपती बिसेन,गुड्डू कटरे आदी मान्यवर उपस्थित होते.त्यानंतर ही रथयात्रा कटंगी,सिलेगाव,चिचगाव,सटवा,डव्वा मार्गे कवलेवाडा येथे पोचली याठिकाणी प्राचार्य साहेबलाल भैरम,डॉ.श्रीप्रकाश रहांगडाले,डॉ.प्रेमेंद्र कटरे,डेमेंद्र रहागंडाले यांनी आयोजित नुक्कड सभेत विचार व्यक्त केले.यावेळी अमर वराडे,कैलास भेलावे,सावन डोये,चंद्रकुमार बहेकार,खेमेंद्र कटरे,प्रा.ठाकूर,प्रा.भगत आदी उपस्थित होते.