सामेवाडा येथे ३०० जणांना विषबाधा

0
17

भंडारा : लाखनी तालुक्यातील सामेवाडा येथे आयोजित लग्नसमारंभात वºहाडी व गावकºयांना सोमवारी अन्नातून विषबाधा झाली. यातील रुग्णांना लाखनीच्या ग्रामीण रुग्णालयात, पिंपळगाव येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. दक्षतेच्या दृष्टीने सामेवाडा येथेही आरोग्य शिबिर सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत ३०० रुग्णांवर उपचार करण्यात आले. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
माहितीनुसार, रविवारी (ता. २९) सामेवाडा येथील रामू लक्ष्मण गिºहेपुंजे यांच्या मुलीचे लग्न सोनू बांगडकर रा. केशवनगर, भंडारा यांच्याशी सोमवाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दुपारी १ वाजता लागले. लग्नासमारंभानंतर वºहाडांनी जेवन घेतले. त्यानंतर सोमवारी सकाळपासून अनेकांना उलटी, हगवणचा त्रास सुरू झाला. पाहता पाहता रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ होऊ लागली. विषबाधा झाल्याचे लक्षात येताच रुग्णांना पिंपळगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तर काही रुग्णांना लाखनीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णांवर तातडीने उपचार व्हावा म्हणून आरोग्य विभागाने सामेवाडा येथे आरोग्य शिबिर सुरू केले.
दुपारपर्यंत अनेक रुग्णांना सुटी देण्यात आली होती तर काही रुग्णांवर अजुनही उपचार सुरू आहे. भंडारा येथील वºहाड्यांनाही हा त्रास जाणवू लागल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. रुग्णांवर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राहूल शेंडे, डॉ. खंडारे, डॉ. तलमले, एच.डी. चांदेवार, डॉ. कुंभरे यांनी उपचार केले.
-अन्नाचे नमूने घेतले
ही विषबाधा नेमकी कशामुळे झाली याचा तपास करण्यासाठी आरोग्य विभागाने तेलाचे पिंप, अन्न, पाणी व शौचचे नमूने प्रयोगशाळेत पाठविले आहेत. प्रयोगशाळेतील अहवालानंतरच विषबाधेचे कारण स्पष्ट होणार आहे.