भंडारा जिल्ह्यात ६0 शेतकर्‍यांच्या शेतात सौर कृषीपंप कार्यान्वित

0
13

भंडारा,दि.१०-जिल्ह्यात शासनाने १९५ सौर कृषीपंप ९५ टक्के अनुदानावर आस्थापित करण्याचे निश्‍चित केले आहे. अटल सौर कृषीपंप योजना अल्प व अत्यल्पभूधारक शेतकर्‍यांकरिता राबविण्यात येत असून ५ एकरापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकर्‍यांना त्यांच्या विहिरीवर किंवा शेततळयांवर अटल सौर कृषीपंप योजनेमध्ये सहभाग घेण्याकरिता शेतकरी अर्ज करू शकतात. जिल्ह्य़ात आजपयर्ंत ६१ सौर कृषीपंप आस्थापित व कार्यान्वित करण्यात आले आहे. शेतकर्‍यांना प्रत्यक्ष सौर कृषीपंपाची कार्यपद्धती व फायदे समजविण्या करिता प्रात्यक्षिक दाखविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शेतकर्‍यांनी नजिकच्या महावितरण कार्यालयात भेट देऊन ३0 मार्चपयर्ंत या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अधीक्षक अभियंता यांनी केले आहे.या योजनेत १0 वर्षाचा विमा व १0 वर्षाची निगा व दुरुस्ती यांचा समावेश आहे. शासनाने ५ एकरापयर्ंतची अट शिथील केली असून आता १0 एकर शेती असलेला शेतकरी यात भाग घेवू शकतो. परंतु त्याकरिता त्यांना १५ टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागेल.

योजनेत ९५ टक्के शासनाकडून अनुदान असून लाभार्थ्यांना केवळ ५ टक्के हिस्सा भरावयाचा आहे. शेतकर्‍यांना कोणत्याच प्रकारचे वीज बिल व इतर चार्जेस भरावी लागत नाही. सद्यस्थितीत शेतकर्‍यांना दिवसा ८ तास व रात्री १0 तास याप्रमाणे चक्राकार पद्धतीने विज पुरवठा उपलब्ध करून दिला जातो. परंतु सौर कृषीपंपामार्फत शेतकर्‍यांना जवळपास १0 ते १२ तास दिवसालाच वीज पुरवठा उपलब्ध असतो. त्यामुळे शेतकर्‍यांना शेतीला पाणी देण्याकरिता रात्रीला जाण्याची आवश्यकता नाही. शेतकर्‍यांनी सौर कृषीपंप योजनेमध्ये सहभाग घेतल्यास तेथे शिल्लक असणारी वीज दुसर्‍या ग्राहकास उपलब्ध करून देता येईल. त्यामुळे सुध्दा भारनियमनाचे प्रमाण कमी होवू शकते. नैसर्गिक आपत्तीमुळे व वादळामुळे लाईनमध्ये बिघाड होऊन वीज पुरवठा खंडित होतो. या योजनेमध्ये ती स्थिती उद्भवणार नाही. सद्यस्थितीत शेतकर्‍यांची वर्षाला ८ ते १0 हजार इतकी बचत होत आहे. भविष्यामध्ये शेतीपंपाचे विजेचे दर वाढू शकतात. त्यामुळे १0 वर्षाचा विचार केल्यास शेतकर्‍यांना विज बिलापोटी शेतकर्‍यांना २ लाख रुपयांच्यावर लाभ होवू शकतो. ज्या शेतकर्‍यांने १0 वर्षाकरिता विमा काढला आहे अशा शेतकर्‍यांना अतिरिक्त शुल्काची आवश्यकता नाही. यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे तसेच चोरीमुळे नुकसान झाल्यास त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. १0 वर्ष देखभाल व दुरुस्तीचा करण्याची योजनेत तरतूद आहे. शेतकरी १0 वर्षानंतर पारंपरिक पद्धतीचा वीज जोडणीकरिता अर्ज करू शकतात. अटल सौर कृषीपंप योजनेमार्फत विशेष विजरोधक योजना बसविण्यात आलेली आहे. त्यामुळे आकाशातून पडणार्‍या विजेपासून संरक्षण मिळेल. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यामुळे मोबाईलद्वारे किंवा संगणकाद्वारे घर बसल्या संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. वीज निर्मिती करिता लागणार्‍या कोळशाची तसेच पाण्याची बचत होणार त्यामुळे प्रदूषण कमी करण्याकरिता मदत होईल. या योजनेचा लाभ घेण्याकरीता अर्जासोबत सातबाराचा उतारा, अल्पभुधारक असल्याचा दाखला, आधारकार्ड व इतर कागदपत्राची आवश्यकता आहे.सौर पंपाचा प्रकार ( एच.पी ) केंद्र शासनाने निश्‍चित ५ एकरपयर्ंत शेतकरी लाभार्थी ५ ते १0 एकरपयर्ंत शेतकरी
व क्षमता केलेली आधारभूत किंमत हिस्सा (५ टक्के ) लाभार्थी हिस्सा (१५ टक्के)
३ अश्‍वशक्ती ए.सी. पंप ३,२४,000/- १६,२00/- ४८,६00/-
३ अश्‍वशक्ती डी.सी.पंप ४,0५,000/- २0,२५0/- ६0,७५0/-
५ अश्‍वशक्ती ए.सी. पंप ५,00,000/- २७,000/- ८१,000/-
५ अश्‍वशक्ती डी.सी.पंप ६,७५,000/- ३३,७५0/- १,0१,२५0/-
७.५अश्‍वशक्ती ए.सी. पंप ७,२0,000/- ३६,000/- १,0८,000/-