शासक समाज होण्यासाठी योग्य दिशेची गरज-बबलू कटरे

0
9

गोरेगाव, दि.१४: -शिक्षित समाजाला संघटित करुन सामाजिक कर्तव्याची जाणीव करुन देण्यासाठी गटातटात आणि विविध जातसमुहात असलेल्या मागाससमाजाला योग्य दिशा मिळाली तर तो समाज शासक समाज म्हणून पुढे येऊ शकतो.फक्त त्यासाठी आपण ज्या समाजात वावरतो,त्या समाजाच्या संस्कृतीचा इतिहासाची खरी जाणिव होणे महत्वाचे आहे असे विचार गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे यांनी व्यक्त केले.
ते क्षत्रिय राजाभोज पोवार समाज डव्वा(सटवा)च्या वतीने १३ फेबुवारीला आयोजित राजाभोज जयंती महोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.सकाळच्या सत्रात शोभायात्रेचे उदघाटन युवा स्वाभीमानचे अध्यक्ष जितेश राणे यांच्या हस्ते दुर्गाभाऊ ठाकरे,सरपंच जगदिश बोपचे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.त्यानंतर सायकांळी आयोजित समापन कार्यक्रमाचे उदघाटन माजी जि.प.सभापती मोरेश्वर कटरे यांच्या हस्ते झाले.बेरार टाईम्सचे संपादक व ओबीसी संघर्ष कृती समितीचे गोंदिया-भंडारा समन्वयक खेमेंद्र कटरे,भाजप महिला आघाडी अध्यक्ष चित्रकला चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख अतिथी म्हणून श्रीशिव प्रतिष्ठान qहदुस्थानचे अध्यक्ष दुर्गेश रहागंडाले,ओबीसी कृती समितीचे महासचिव शिशिर कटरे,सटवाचे सरपंच रमेश ठाकुर,बाजार समिती संचालक के.टी.कटरे,रुषीलाल टेंभरे,मुकेश तुरकर,विनोद पारधी,मनिष गौतम,श्री चौधरी,श्री बिसेन,एच.एस.बिसेन,डॉ.पेमेंद्र कटरे,डॉ.रमेश कटरे,जगदिश कटरे,डेविड कोल्हे,योगेश चौधरी,छोटेलाल पारधी विचारमंचावर उपस्थित होते.यावेळी बोलतांना बबलु कटरे म्हणाले की,कधी काळी आपला समाज हा शासक समाज म्हणून ओळखला जायचा,परंतु आज आपल्या समाजाची परिस्थिती मागास झालेली आहे.आपण जातीच्या नावे संघटित होत असलो तर घटनात्मक अधिकार मिळवायचे असेल तर प्रवर्गाशिवाय पर्याय नसल्याने ओबीसीच्या माध्यमातून संघटित होऊन आपली दिशा ठरवणे गरजेचे आहे.qसधु,गोंडीयन व द्रविडीयन संस्कृती आपली विकसीत संस्कृती होती आज ती लयास गेल्यानेच आपल्याला संस्कृतीचा विसर पडल्याचे सांगत संस्कृतीचा विकासही महत्वाच असल्याचे म्हणाले.यावेळी मोरेश्वर कटरे यांनी उदघाटकीय भाषणात शिक्षण व नोकरीमध्ये आपला समाज पुढे गेला असे वाटत असले तरी मुख्यप्रशासकीय पदावर आपण पोचलो नाही,त्या जागा आपल्या समाजातील मुलांना कशा मिळतील याचा विचार करतानाच आधुनिक शेतीवर भर देण्याची वेळ आल्याचे सांगितले.पोवार समाज आता कुठे संघटित व्हायला लागला असून हा संघटन यशस्वीपणे टिकवून ठेवण्यासाठी राजकारणाला दुर ठेवण्याचे आवाहन केले.खेमेंद्र कटरे,दुर्गेश रहागंडाले,शिशिर कटरे,चित्रलेखा चौधरी,मुकेश तुरकर,डॉ.पेमेंद्र कटरे,डॉ.रमेश कटरे आदींनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले.संचालन योगेश चौधरी यांनी केले.आयोजनासाठी कमलेश बिसेन,दुर्गाप्रसाद कोल्हे,लोकचंद टेंभरे,पप्पू कटरे,मुकेश बघेले,लक्की बघेले,दिपक तुरकर,किशोर बघेले,गौरव कटरे,दुर्गेश कटरे,रामेश्वर कोल्हे,सुरेश कोल्हे,रवी कटरे व शेखर बोपचे यांनी सहकार्य केले.