१ ते ३१ मार्चपर्यंत कायदेविषयक जनजागृती व लोकअदालतींचे आयोजन

0
9

गोंदिया,दि.१८ : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय मार्फत तसेच तालुका विधी सेवा समिती आमगाव, देवरी, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव व तिरोडा अंतर्गत मार्च २०१७ या महिन्यात जिल्ह्यातील दुर्गम भागातील विविध गावांमध्ये फिरते कायदेविषयक साक्षरता शिबीरे व लोकअदालतींचे आयोजन करण्यात आले आहे. या फिरते कायदेविषयक साक्षरता शिबीरे व लोकअदातीचा शुभारंभ १ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हा न्यायालय गोंदिया येथून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्या हस्ते होणार आहे.
१ मार्च रोजी ग्रामपंचायत कार्यालय ढाकणी येथे, २ मार्च- ग्रामपंचायत कार्यालय बिरसोला, ३ मार्च- ग्रामपंचायत कार्यालय दांडेगाव, ४ मार्च- ग्रामपंचायत कार्यालय तुमखेडा/खुर्द, ६ मार्च- ग्रामपंचायत कार्यालय घोटी, ७ मार्च- ग्रामपंचायत कार्यालय महागाव, ८ मार्च- ग्रामपंचायत कार्यालय करांडली, ९ मार्च- ग्रामपंचायत कार्यालय येरंडी/देव, १० मार्च- ग्रामपंचायत कार्यालय सौंदड, १४ मार्च- ग्रामपंचायत कार्यालय तिडका, १५ मार्च- ग्रामपंचायत कार्यालय मंडीटोला, १६ मार्च- ग्रामपंचायत कार्यालय ठाणा, १७ मार्च- ग्रामपंचायत कार्यालय कालीमाटी(आमगाव), १८ मार्च- ग्रामपंचायत कार्यालय तिगाव, २० मार्च- ग्रामपंचायत कार्यालय दरेकसा, २१ मार्च- ग्रामपंचायत कार्यालय गोवारीटोला, २२ मार्च- ग्रामपंचायत कार्यालय लोहारा, २३ मार्च- ग्रामपंचायत कार्यालय काकोडी, २४ मार्च- ग्रामपंचायत कार्यालय पालांदूर, २७ मार्च- ग्रामपंचायत कार्यालय मेंढा, २९ मार्च- ग्रामपंचायत कार्यालय मुंडीकोटा, ३० मार्च- ग्रामपंचायत कार्यालय महालगाव व ३१ मार्च- ग्रामपंचायत कार्यालय अर्जुनी(तिरोडा) येथे लोकअदालत होणार आहे.
संपूर्ण मार्च महिन्यात ठरलेल्या ठिकाणी विविध विषयांवर कायदेविषयक जनजागृतीपर कार्यक्रम व नंतर लोकअदालतीमध्ये संबंधित न्यायालयातील प्रलंबीत दिवाणी व फौजदारी तडजोड योग्य प्रकरणे तसेच पूर्व न्यायप्रविष्ट प्ररणांचा सामंजस्याने निपटारा करण्यात येणार आहे. याकरीता संबंधित न्यायालयांचे न्यायाधीश, सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश सी.पी.चौधरी तसेच एक वकील व एक सामाजिक कार्यकर्ता हे पक्षकारांना त्यांची प्रकरणे तडजोड करण्यास मदत करणार आहेत. ज्या पक्षकारांना त्यांची तडजोडपात्र प्रलंबीत किंवा दाखलपूर्व प्रकरणे व फिरते लोकअदालतीमध्ये तडजोड करावयाची आहेत त्यांना संबंधित न्यायालयात किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया तसेच संबंधित तालुका न्यायालयातील तालुका विधी सेवा समितीकडे २० फेब्रुवारी पर्यंत संपर्क साधावा. तरी जिल्ह्यातील जनतेनी या फिरते कायदेविषयक साक्षरता शिबीरे व लोकअदालतींचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव श्रीमती इशरत शेख/नाजीर यांनी केले आहे.